रैना म्हणतो या माजी खेळाडूमुळे कुलदीप यादव आहे भारतीय संघात !

भारताचा स्टार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाच्या मते कुलदीप यादव आता संघात आहे ते फक्त आणि फक्त भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामुळे. कुलदीप यादवला भारताच्या या स्टार माजी लेग स्पिनरने चांगली कामगिरी करण्यासाठी खूप मदत केली आहे असे सुरेश रैना म्हणाला.

कानपूरच्या या २२ वर्षीय चायनामॅन गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पणाच्या कसोटी मालिकेत खूप प्रभावीत केले होते आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाजही बनला.

सुरेश रैना म्हणतो

कुलदीप यादव खूप चांगली गोलंदाजी करत आहे आणि त्याचे श्रेय अनिल कुंबळे यांना जाते. त्यांनी कुलदीपसोबत खूप मेहनत केली आहे, मी आयपीएलमध्ये त्याच्याशी बोललो होतो आणि तो नेहमी अनिल कुंबळेंबरोबर संवाद साधायचा. कुलदीपने त्याच्या केकेआर या आयपीएल संघातील सहकारी ब्रॅड हॉगकडूनही खूप काही शिकले आहे.

कुलदीप यादवची कारकीर्द अजून नवीन आहे. टी२० क्रिकेटमध्ये त्याने मागील काही काळात चांगली कामगिरी केली आहे. त्याच बरोबर तो वनडेमध्ये ही उत्तम गोलंदाजी करत आहे. वनडेमध्ये आता अश्विनसाठीचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघितले जात आहे. स्वतः अश्विनही हे मान्य केले आहे की कुलदीप चांगली कामगिरी करत आहे.