तिसरी कसोटी: जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी!

पल्लेकेल: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान तिसरी आणि शेवटची कसोटी आज येथे सुरु होणार आहे. जडेजावर एक सामन्याची बंदी घालण्यात आल्यामुळे चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला या सामन्यात संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत इंडिया अ बरोबर असलेल्या अक्सर पटेलला ताबडतोब बोलवून घेण्यात आल्यामुळे नक्की कुणाला संधी मिळणार हा मोठा प्रश्न होता. परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने कुलदीपला संधी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

धरमशाला येथे पहिली आणि शेवटची कसोटी खेळलेला कुलदीप यादव हा एक उत्तम गोलंदाज असून कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याला मोठी संधी असल्याचं कोहलीने म्हटले आहे.

कुलदीप यादव भारताकडून १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने कसोटीत ४ तर एकदिवसीय सामन्यात ८ बळी मिळवले आहेत.