कोण आहे कुलदीप यादवचा आवडता फुटबॉलपटू ?

भारतीय संघाचा जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव अवघ्या काही महिन्याच्या कालावधीत भारतीय संघात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. त्याने लेग स्पिन, गुगली, स्ट्रेट बॉल आणि चायनामन या कौशल्याने पूर्ण जगाला त्याच्या गोलंदाजीची दाखल घायला भाग पडले आहे. त्यातही त्याची गुगली अनेक फलंदाजांची भांबेरी उडवून देते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक विडिओ शेयर केला आहे. त्यात या चायनामन गोलंदाजाची भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्माने एक मुलाखत घेतली आणि त्यात त्याने अनेक गुगली टाकल्या परंतु या गोलंदाजाने भारतीय फलंदाजाच्या प्रश्नांच्या गुगलीचा उत्तम सामना केला आणि आपल्या आवडी निवडी सांगितल्या.

या मुलाखतीत कुलदीप यादवला रोहित शर्माने अनेक प्रश्न विचारले. उदाहरणार्थ रोहितने त्याला विचारले की त्याला भविष्यात कोणती गाडी घायला आवडेल. त्यावर त्याने उत्तर दिले की, “नव्वदीच्या दशकातील मस्टँग ही गाडी घ्यायला आवडेल असे त्याने सांगितले.” या मुलाखतीत आपले फुटबॉल विषयीचे प्रेम आणि आवड त्याने सांगितली.

या मुलाखतीत त्याला रोहित शर्माने विचारले की कोणा एका व्यक्तीचा मोबाईल नंबर तुला तुझ्या मोबाइलमध्ये हवा आहे की ज्यामुळे तू त्या व्यक्तीशी केव्हाही बोलू शकशील. त्यावर उत्तर देताना कुलदीप म्हणाला, “नेमार ज्युनियर, या खेळाडूचा मी खूप मोठा चाहता आहे. त्याला मी नेहमी फॉलो करतो. त्याचा नंबर मला माझ्या मोबाईलमध्ये हवा आहे. जर भविष्यात त्याला भेटण्याची संधी मिळाली तर मी नक्की भेटेल.”