कर्णधाराला माझी काम करण्याची शैली आवडत नाही हे काल पहिल्यांदा समजलं: अनिल कुंबळे

प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यांनतर अनिल कुंबळेने ३ तासांनी अधिकृतपणे ट्विटरवरून याची घोषणा केली. याबरोबर कुंबळेने एक छोट प्रसिद्धीपत्रकही जोडलं आहे.

त्यात कुंबळे म्हणतो, “मला याचा अभिमान  वाटतो की मला क्रिकेट सल्लागार कमिटीने प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ वाढविला. गेल्या एक वर्षातील सर्व चांगली  कामगिरी ही कर्णधार, संपूर्ण टीम, प्रशिक्षक आणि सपोर्टींग स्टाफ यांच्यामुळे झाली आहे. ”

“मला काल भारतीय क्रिकेट बोर्डाकडून समजलं की कर्णधाराला माझी कार्यशैली किंवा काम करण्याची पद्धत पटत नाही. तसेच यापुढे तो माझ्याबरोबर काम करण्यासाठी इच्छुक नाही. मी कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील सर्व मर्यादांचा आदर केला. भारतीय क्रिकेट बोर्डाने आमच्यातील विसंवाद सोडविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही होऊ शकले नाही. म्हणून मी हा निर्णय घेऊन पुढे जाणे पसंद करत आहे. ”

वाचा कुंबळेच संपूर्ण प्रसिद्धी पत्रक येथे: