१२ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुबंळेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता.

मात्र आजच्याच दिवशी १२ वर्षांपुर्वी १० ऑगस्ट २००७ साली इंग्लंड संघ अनिल कुंबळेच्या फलंदाजीमुळे चांगलाच अडचणीत सापडला होता.

भारत-इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अनिल कुंबळेने शतक झळकावत भारताकडून कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक करणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला होता. यावेळी कुंबळे ३६ वर्षे आणि २९६ दिवसांचा होता.

तसेच सर्व प्रकारचे ३८९आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर कुंबळेला आपले पहिले कसोटी शतक करण्यात यश आले होते.

या सामन्यात कुंबळेने १९३ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १ षटकार आणि १६ चौकार मारले होते.

त्याचबरोबर गोलंदाजीतही कुंबळेने चमकदार कामगिरी करत पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात २ बळी मिळवले होते.

हा सामना अखेर अनिर्णित राहिला होता.

अनिल कुंबळेच्या या कामगिरीसाठी त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

संक्षिप्त धावफलक-

भारत पहिला डाव: सर्वबाद 664 धावा

इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 345

भारत दुसरा डाव: 6 बाद 180 घोषीत

इंग्लंड दुसरा डाव: 6 बाद 369

सामनावीर: अनिल कुंबळे (5 विकेट , 118 धावा )

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

स्वातंत्र्यदिनी एमएस धोनी करणार हे खास काम?

विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडेतील विराट कोहलीचा हा व्हि़डिओ होतोय व्हायरल

भारताला एकवेळ नडलेला क्रिकेटपटू आता होणार प्रशिक्षक!