क्वान एंटरटेनमेंट आता आघाडीचा भारतीय क्रिकेटर शिखर धवनसोबत

दिनेश कार्तिक, शुभमन गिल, सानिया मिर्झा, दीपिका पल्लीकल यांच्यासह धवनचाही समावेश

मुंबई । क्वान एंटरटेनमेंट या भारतातील आघाडीच्या एंटरटेनमेंट मार्केटप्लेस असलेल्या कंपनीने भारतीय क्रिकेट सुपरस्टार शिखर धवनचा त्याच्या स्पोर्ट्स पोर्टफोलिओमध्ये सहभागी करून घेण्याची घोषणा केली.

तीन वर्षांच्या कराराअंतर्गत धवन क्वानच्या एन्डोर्समेंट, लाईव्ह अपिअरन्स, डिजिटल ऍक्टिवव्हेशन या मैदानाबाहेरील गोष्टींमध्ये क्वानचे प्रतिनिधित्व करेल.

शिखर धवन आल्याने क्वानची स्पोर्ट्स एंटरटेनमेंटची बाजू आणखीनच भक्कम झाली आहे.यापूर्वीच क्वान सोबत अनेक आघाडीचे खेळाडू आहेत.

आघाडीच्या खेळाडूचा सहभाग असल्याने भारतीय स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या विश्वात क्वानची ताकद आणखीनच वाढणार आहे. क्वान भारतीय स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या विश्वातील आघाडीचे नाव आहे.

त्यांच्याकडे शिखर धवनशिवाय आघाडीच्या क्रिकेटपटूमध्ये दिनेश कार्तिक व शुभमन गिलचा समावेश आहे. यासह टेनिस स्टार सानिया मिर्झा व स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांचा समावेश आहे.

या कराराबाबत बोलताना क्वान एंटरटेनमेंटचे फाऊंडिंग पार्टनर व को सीईओ इंद्रनील दास ब्लाह म्हणाले की, क्वान एंटरटेनमेंटसाठी क्रीडा क्षेत्र महत्वाचे आहे. मार्केटमधील वाढत्या मागणीनुसार आम्ही पोर्टफोलिओमध्ये भर घातली आहे. शिखरने क्लब व देशासाठी चमकदार कामगिरी केलेली आहे.क्वान कुटुंबासोबत तो आल्याने आम्ही आनंदी आहोत.

शिखर धवन भारतीय संघाकडून सर्वच फॉरमॅटमध्ये सहभाग नोंदवतो. तर, आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.त्याने 2004 सालच्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा नोंदवल्या होत्या त्यासोबतच 2013 व 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत देखील चमक दाखवली होती.

टॅलेंट मॅनेजमेंट व स्पोर्ट्स मार्केटिंगमधील क्वान दृष्टीकोन पाहून अनेक आघाडीचे खेळाडू त्यांच्यासोबत आहे.त्यांच्या टीमची मेहनत पाहून मी प्रभावित झालो. आमची ही भागिदारी नक्कीच यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे. असे शिखर धवन म्हणाला.क्वानचा प्रयत्न भविष्यात आणखीन अशाच प्रकारच्या भागिदारी करण्याचा असणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये

एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती