स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती

इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला मंगळवारी(11 सप्टेंबर) होणाऱ्या स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यात आराम दिला आहे. टोटेनहॅम हॉटस्परच्या या 25 वर्षीय खेळाडूने रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात सहा गोल करून गोल्डन बूट जिंकला होता.

केन फिफा विश्वचषकात 573 मिनिटे खेळला. तसेच हा हंगाम सुरू झाल्यापासून त्याने 61 सामने खेळले आहेत. केनने गॅरेथ साउथगेट यांच्या प्रशिक्षणाखाली 14 सामन्यात 14 गोल केले आहेत.

केनच्या अनुपस्थितीत त्याचा क्लब सहकारी एरिक डायर हा संघाचा कर्णधार असणार आहे. साउथगेट या सामन्यात नऊ बदल करू शकतात. युफा नेशन लीगमध्ये इंग्लंड स्पेनकडून 2-1ने पराभूत झाला आहे.

इंग्लंड संघ कधीही सलग चार सामन्यात हरला नाही. असे झाले तर तब्बल 146 वर्षांपासून फुटबॉल खेळत असलेला इंग्लंडची ही सर्वाधिक खराब कामगिरी ठरेल.

तसेच टोटेनहॅमचा मिडफिल्डर डेले अली पण स्नायुंच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 22 वर्षीय डेले स्पेन विरुध्दच्या सामन्यात जखमी झाला होता. तसेच तो शनिवारी होणाऱ्या प्रीमियर लीगच्या सामन्यापर्यंत ठीक होईल.

“अलीची दुखापत फार मोठी नसून तो त्याच्या क्लबसाठी खेळण्यास फिट होईल”, असे साउथगेट म्हणाले.

तसेच ल्युक शॉ हा पण स्पेन विरुद्धच्या सामन्यात जखमी झाल्याने तो त्याचा क्लब मॅंचेस्टर युनायटेडकडे परत गेला आहे.

शेवटी हे दोन संघ युरोच्या पात्रता फेरीत समोरा-समोर आले होते. हा सामना इंग्लंडने 2-0ने जिंकला होता. यावेळी केन आणि वेन रूनी यांनी हे गोल केले होते.

स्वित्झर्लंड विरुद्ध हा सामना लिसेस्टरच्या कींग पॉवर स्टेडियमवर होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकला मिळाली ३३ बिअर बॉटल्सची भेट

फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व