ला लीगाच्या संघांचा अमेरिकेत खेळण्यास नकार

प्रीमियर लीगची ३८ सामन्याच्या मौसमानंतर अतिरिक्त एक सामना बाहेरच्या देशात खेळण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरली नाही पण त्यांची हीच संकल्पना चालू मौसमात राबवण्याचा निर्णय ला लिगाने मागील आठवड्यात घेतला.

याच निर्णयाला विरोध करण्यासाठी रियल मॅड्रिडचा कर्णधार सर्जिओ रामोस आणि बार्सिलोनाचा कर्णधार लिओ मेस्सी ला लीगाच्या उरलेल्या १८ संघांच्या कर्णधारांसोबत आज स्पॅनिश फुटबॉलर्स असोसिएशनच्या (एएफई) मुख्यालयात जमणार आहेत.

त्यांचा या निर्णयाला विरोध आहे आणि ते यात सहभाग घेणार नाही असे त्यांचे धोरण असेल. स्पॅनिश फुटबॉलर्स असोसिएशनचे अध्यक्ष डेविड अगांझोसुद्धा असोसिएशनला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याबद्दल ला लिगाच्या अध्यक्ष जावीर तेबास विरुद्ध आपले मत मांडणार आहेत.

ला लिगाने हा निर्णय खेळाडू किंवा असोसिएशनचा सल्ला किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता घेतल्याने सर्वांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच ला लिगा प्रीमियर लीगप्रमाणे काही सामने शुक्रवार आणि सोमवार रात्री हलवण्याच्या तयारीत आहे. तसेच खेळाडूंचा मध्यरात्री सुरु होणाऱ्या सामन्यांना सुद्धा विरोध असेल आणि त्याबद्दल ते आजच्या बैठकीत आपले मत मांडतील.

ला लिगाने याच मौसमातील काही सामने अमेरिका तसेच कॅनडामध्ये घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त सामने होणार नसून या सामन्यांचे कोणतेच वेळापत्रक किंवा कोणते संघ हे सामने खेळतील हे स्पष्ट झाले नाही. पण प्रेक्षकांसाठी आकर्षण म्हणून बार्सिलोना किंवा रियल मॅड्रिडचा सामना होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

ला लिगाच्या या निर्णयामुळे चांगलाच वाद होऊ शकतो. त्यांच्या ला लिगाला बाहेरच्या देशात प्रसिद्धी मिळण्यासाठीच्या घेतलेल्या या निर्णयावर त्यांना पुन्हा एकदा विचार करावा लागेल असे दिसत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचे संपुर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल होणार मुंबईत

चेल्सीचा मॅनेजर मौरीझियो सॅरी संपवतो दिवसाला सिगरेटची पाच पाकिटे