टी२० विश्वचषकात भारताला विजय मिळवुन देणारे मॅनेजर झिंबाब्वेचे प्रशिक्षक

मुंबई | भारतीय संघाचे माजी सलामीवीर लालचंद रजपूत यांची झिंबाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेट असोशियशनने ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.

यापुर्वी मे महिन्यात रजपुत यांना याच संघाचे तिरंगी मालिकेसाठी प्रशिक्षक करण्यात आले होते.

रजपुत यांनी या निवडीबदद्ल आनंद व्यक्त केला आहे. “मी या निवडीने आनंदी आहे आणि माझ्यासमोरील आव्हानांना सामोरे जायला तयार आहे. माझ्यातील प्रशिक्षकाची क्षमता अचुक हेरल्याबद्दल मी झिंबाब्वे बोर्डाचे आभारी आहे. तसेच मला तीन वर्षांचा कार्यकाळ दिल्याबद्दल आभारी आहे. “असे रजपुत म्हणाले.

रजपुत यांची कारकिर्द- 

-भारताकडून खेळले २ कसोटी आणि ४ वनडे सामने

-२००७ला एमएस धोनीच्या संघाने जेव्हा टी२० विश्वचषक जिंकला तेव्हा ते या संघाचे मॅनेजर होते.

-२००८मध्ये भारतीय संघाने जेव्हा आॅस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकली तेव्हाही ते या संघाचे मॅनेजर होते.

-यापुर्वी त्यांनी अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपद २०१६पासून सांभाळले होते. याच संघाने जूनमध्ये भारताविरुद्ध बेंगलोरला कसोटी सामना खेळला होता. तसेच संघाच्या जडणघडणीत रजपुत यांचा वाटा असल्याचे सांगितले होते.

-गेल्या हंगामात या दिग्गज माजी खेळाडूने असाम संघाला मार्गदर्शन केले होते. तसेच ते मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. तसेच मुंबई क्रिकेट असोशियशनमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा

८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी

– भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक

केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक