आयपीएलचे माजी अध्यक्ष ललीत मोदींच्या पत्नीचे निधन

इंडियन प्रीमियर लीगचे(आयपीएल) माजी अध्यक्ष ललीत मोदी यांची पत्नी मिनल मोदी यांचे सोमवारी(10 डिसेंबर) वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ललीत मोदींनी ट्विट करुन दिले आहे.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझी पत्नीने अखेर शेवटचा श्वास घेतला आहे. मला खात्री आहे तू आम्हाला वरुन पाहत आहेस. मी तूला वचन देतो की आपल्या मुलांना प्रेमाने मोठे करेल आणि संरक्षण देईल. मला माहित आहे तू नेहमी आमच्या बरोबर राहशील. आमच्यासाठी हे कठीण आहे. पण तू आम्हाला कठोर व्हायला शिकवले आहेस.’

मोदींनी त्यांच्या पत्नीच्या निधनाचे कारण दिलेले नाही, पण त्या मागील काही वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत होत्या.

मोदींवर 2010 मध्ये आयपीएल घोटाळ्याचे आणि भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर बीसीसीआयने बंदी घातली होती. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी म्हणुन विराटने काय केले पहाच

दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पृथ्वी शाॅच्या सहभागाबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी

चार तासात विराट-अनुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स