निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार

मागील काही काळापासून निवृत्तीची चर्चा असणाऱ्या लसिथ मलिंगाची न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या श्रीलंकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांची न्यूझीलंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून(15 डिसेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेनंतर 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे आणि एकमेव टी20 सामन्याची मालिका होणार आहे. या मालिकेत मलिंका श्रीलंकेचे नेतृत्व करेल.

35 वर्षीय मलिंगाने याआधी 2014 च्या टी20 विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने भारताला या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.

पण फेब्रुवारी 2016 मध्ये संयुक्त अरब अमिराती विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यानंतर सततच्या दुखापतीमुळे त्याला श्रीलंका संघाचे कर्णधारपद गमवावे लागले. यानंतर त्याने फक्त यावर्षी भारताविरुद्ध आॅगस्टमध्ये एका वनडे सामन्यात श्रीलंकेचे कर्णधारपद सांभाळले होते.

मलिंगाने सप्टेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. पुनरागमनानंतर त्याने दम्बुल्लामध्ये इंग्लंड विरुद्ध वनडे सामन्यात 44 धावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी घोषित करण्यात आलेल्या 17 जणांच्या श्रीलंका संघाचा निरोशान डिकवेल्ला उपकर्णधार असेल. तसेच अँजेलो मॅथ्यूजचे संघात पुनरागमन झाले आहे. सिक्कुगे प्रसन्नाचाही 17 जणांच्या श्रीलंका संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे वनडे आणि टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ-

लसिथ मलिंगा(कर्णधार), निरोशान डिकवेल्ला(उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दनुष्का गुनथिलका, कुसल परेरा, दिनेश चंडीमल, असेला गुणारत्ने, कुसल मेंडिस, धनंजया डि सिल्वा, थिसरा परेरा, दसुन शनका, लक्षण संदकन, सिक्कूगे प्रसन्न, दुशमंथा चमिरा, कसुन रजिथा, नुवान प्रदिप आणि लहिरु कुमारा.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव

सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का