मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय

श्रीलंका क्रिकेटने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला देशांतर्गत सामने खेळण्यासाठी देशात परत बोलावले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी) चे असे म्हणणे आहे की, जर तो देशांतर्गत सामने खेळला तरच त्याची श्रीलंका संघात निवड होऊ शकते.

मात्र त्याने एसएलसीच्या या प्रस्तावाला नकार दिला आहे. सध्या मलिंगा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा मार्गदर्शक आहे.

यावर्षीच्या आयपीएल लिलावात त्याला मुंबईने घेतले नव्हते तेव्हा तो श्रीलंकेतील देशांतर्गत सामने खेळण्यास उपलब्ध होता. त्यानंतर त्याने मुंबईच्या गोलंदाजीच्या मार्गदर्शकाची भुमिका स्विकारली.

याबद्दल एसएलसीचे अध्यक्ष थिलांगा सुमाथिपाला म्हणाले, “निवडकर्ते त्याला संघात घेऊ इच्छित आहे पण त्याने देशांतर्गत सामने खेळण्यास नकार दिला आहे. आम्ही त्याला टी-20 अांतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बोलावणार होतो.”

एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डी सिल्वा यांनी मलिंगाला चेतावणी देताना म्हटले,” जर तो देशांतर्गत सामने खेळण्यास नकार देत आहे तर त्याच्यासाठी अांतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद होऊ शकतात.”

आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सर्वात जास्त विकेट्स आहेत. त्याने 110 सामन्यात 19.01च्या सरासरीने 154 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल!

Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर

डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…