मलिंगाचे एशिया कपसाठी श्रीलंका संघात कमबॅक

15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी श्रीलंकेने 16 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मंलिगाचीही निवड झाली आहे. तो जवळजवळ 1 वर्षांनी श्रीलंका संघात पुनरागमन करणार आहे.

तो श्रीलंकेकडून शेवटचा वनडे सामना सप्टेंबर 2017 मध्ये भरताविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि नंतर फिटनेसच्या कारणाने वर्षभर संघाच्या बाहेर होता.

तसेच श्रीलंका मागील 12 मालिकेत फक्त 2 मालिका जिंकली आहे. त्यामुळे मलिंगाच्या संघातील पुनरागमनाने श्रीलंका संघाला नवीन आशा मिळेल.

त्याने आत्तापर्यंत श्रीलंकेकडून वनडेत 301 विकेट्स घेतल्या असून तो विश्वचषकात 2 हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाजही आहे.

याबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रीलंका संघात समावेश असणारे निरोशान डिकवेल्ला, लहिरु कुमारा, प्रभात जयसुर्या आणि शेहान जयसुर्या यांना मात्र आशिया चषकासाठी श्रीलंका संघातून वगळण्यात आले आहे.

तसेच 6 सामन्यांच्या बंदीनंतर दिनेश चंडिमलला श्रीलंका संघात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दनुश्का गुनथिलकाचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

ही आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडणार असून पहिलाच सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा दुबईत रंगणार आहे.

 

असा आहे आशिया चषकासाठी श्रीलंकेचा संघ- 

अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, कुसल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुश्का गुनथिलका, थिसरा परेरा, दसुन शनका, धनंजय डि सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवन परेरा, अमिला अपोन्सो, कसून रजीथा, सुरंगा सकमल, दुश्मंथा चमिरा, लसिथ मलिंगा.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…

ड्वेन ब्रावोकडून टी२०त षटकारांची बरसात, केली धमाकेदार खेळी

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक