पहा विडोओ- शिखर धवन शिकतोय बासरी!

भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनच्या व्यक्तीमत्वाची एक वेगळीच बाजू आज चाहत्यांना बघायला मिळाली आहे. सध्या तो बासरी वाजविण्याची कला शिकत आहे.

याचा एक व्हिडिओही शिखरने ट्विटरवर शेअर केला आहे. यात शिखर त्याचे गुरू वेणुगोपाल यांच्यासोबत बासरी वाजवत आहे.

त्याचबरोबर त्याने ट्विट करून तो बासरी शिकत असल्याचे सांगितले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहीले आहे की ” मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचे आहे, जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ती माझ्या व्यक्तीमत्वाची वेगळी बाजू आहे.”

“मागील 3 वर्षांपासून मी बासरी (माझे आवडते वाद्य) शिकत आहे.  त्याचे शिक्षण माझे गुरू वेणुगोपाल जी यांच्याकडून घेण्याचा मला बहुमान मिळाला आहे. अजून मला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे, पण मला आनंद आहे मी त्याची सुरवात केली. ”

नुकतेच आयपीएल संपल्याने आणि सध्या कोणताही सामना नसल्याने शिखर कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये 16 सामन्यात 38.23 च्या सरासरीने 497 धावा केल्या आहेत.

तसेच 14 ते 18 जून दरम्यान होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी शिखरची संघात निवड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी संघात पुनरागमन आयपीएलमुळेच शक्य झाले- जॉस बटलर

भारताचा तिसरा मोठा खेळाडूही पडणार अफगाणिस्तान कसोटी मालिकेतून बाहेर?

विराट जास्तवेळ जिममध्ये जात नाही तरीही एवढा फीट कसा?

आणि सुनिल छेत्रीने केले पाकिस्तानच्या चाहत्यांसमोर सेलिब्रेशन

वकार युनुसने केलेल्या त्या ट्विटने जिंकली भारत-पाकिस्तान चाहत्यांची मने