मागील 36 वर्षांपासून या क्लबचा किमान एकतरी खेळाडू फिफाचा अंतिम सामना खेळलाय

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात फ्रान्स अंतिम सामन्यात पोहचला आहे. 10 जुलैला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा 1-0 असा पराभव केला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1982 ते 2018 या दरम्यान प्रत्येक विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचचा खेळाडू खेळला आहे.

सध्या सुरू असलेल्या फिफा स्पर्धेत फ्रान्सचा मिडफिल्डर कोरेंटिन टॉलिसो हा बायर्न म्युनिच या क्लबकडून खेळतो. म्युनिचकडून खेळताना टॉलिसोने एकूण 10 गोल केले आहेत.

टॉलिसोने युरो चॅम्पियन लीगमध्ये 8 सामन्यात 3 तर बुन्देस्लीगा या जर्मन लीगमधील 26 सामन्यात 6 गोल केले.

2014च्या फिफा विश्वचषकात म्युनिच संघाकडून खेळणारा थॉमस मुलेर हा जर्मन संघाचा खेळाडू होता.

तसेच फ्रान्सने बाद फेरीत अर्जेंटीनाला तर उपांत्य पूर्व फेरीत उरूग्वेला पराभूत केले आहे. 15 जुलैला ते कोणत्या संघाला भिडणार हे आजच्या सामन्यातून समजेल.

फ्रान्सने फिफामध्ये बेल्जियमला सलग तिसऱ्यांदा पराभूत केले आहे. फ्रान्सने 1938च्या साखळी फेरीत 3-1 असा आणि 1986च्या विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी खेळलेल्या सामन्यात 4-2 असा बेल्जियमचा पराभव केला आहे.

10 जुलैला झालेल्या सामन्यात त्यांनी बेल्जियम हरवून विजयाची हॅट्ट्रीक केली.

आजचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया असा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषक: फ्रान्सच्या पोग्बाने उपांत्य फेरीचा विजय गुहेतून सुटका झालेल्यांना समर्पित केला

क्रोएशियाच्या स्ट्रायकरने भरले सामना पहायला आलेल्या चाहत्यांचे 3000 पौंडचे बील