प्रो कबड्डी : काल झाल्या या तीन महत्वपूर्ण घडामोडी

प्रो कबड्डीमध्ये काल अनेक विक्रम झाले. काल प्रो कबड्डीमध्ये पहिला सामना यु मुंबा आणि पटणा पायरेट्स या संघात झाला. हा सामना यु मुंबाने ४१-५१ असा जिंकला. अपेक्षेप्रमाणे या सामन्यात गुणांचा पाऊस आपणास पाहायला मिळाला. प्रो कबड्डीमध्ये सलग तीन सामने बरोबरीत सुटले होते. परंतु हा सामना बरोबरीत सुटणार नाही याची दक्षता घेत हा सामना यु मुंबाने जिंकला.

#१ अनुप कुमारच्या नावे झाले ५०० गुण, अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू –
जागतिक कबड्डीमध्ये सर्वाधीक वलयांकित खेळाडू अनुप कुमारने प्रो कबडीमध्ये ५०० गुण मिळवण्याचा करिष्मा साधला आहे. अशी कामगिरी करणारा अनुप राहुल चौधरी नंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. मागील काही सामान्यांपासून कबड्डीप्रेमींना अनुप कधी ५०० गुण मिळवतो याचे वेध लागले होते. अनुपने ५०० गुण मिळवण्यासाठी ७० सामने खेळले आहेत. राहुल चौधरीने ५०० गुण मिळवण्यासाठी ६० सामने घेतले होते.

#२ प्रदीप नरवाल ४०० रिडींग गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दाखल –
रेडींग मशीन, डुबकी किंग अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा प्रो कबडीमधील चमकता सितारा प्रदीप नरवाल याने कालच्या सामन्यात २१ गुण मिळवत ४०० रेडींग गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला. प्रदीप नरवाल ४०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. फक्त रेडींगचा विचार केला तर ४०० गुण मिळवणारा तो केवळ चौथा खेळाडू आहे.

#३ बरोबरीत सामन्यांची मालीका खंडित-
७ सप्टेंबर कोलकाता लेगचा शेवटचा सामना आणि ८ सप्टेंबर हरियाणा लेगचे दोन्ही सामने हे बरोबरीत सुटले होते. बेंगाल वॉरियर्स वि. दबंग दिल्ली (३१-३१), हरयाणा स्टीलर्स वि. पटणा पायरेट्स (४१-४१), गुजरात फॉरचूनजायन्टस वि. यु.पी.योद्धा (३०-३०) हे तीन सामने अनुक्रमे बरोबरीत सुटले होते. यानंतर झालेला यु मुंबा वि. पटणाचा सामना यु मुंबाने जिंकला. त्यामुळे सामने बरोबरीत सुटण्याची मालिका खंडीत झाली.