लता मंगेशकरांची धोनीला मोठी विनंती, ‘धोनी, असे करु नको’

2019 विश्वचकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताला काल(10 जूलै) न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवाबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. या पराभवानंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

पण कालच्या सामन्यानंतर भारताची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्ती न घेण्याची विनंती केली आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे की ‘नमस्कार एमएस धोनी, आजकाल मी ऐकून आहे की तू निवृत्ती घेणार आहेस. कृपया तू असा विचार करु नको. देशाला तूझ्या खेळाची गरज आहे आणि माझी तूला विनंती आहे की निवृत्तीचा विचारही तू मनात आणू नको.’

तसेच भारताच्या पराभवानंतर भारतीय संघाला प्रेरणा देण्यासाठी लता मंगेशकर यांनी गुलजार यांचे ‘आकाश के उस पार’ हे गाणे समर्पित केले आहे. याबद्दल ट्विट करताना त्यांनी लिहिले आहे की ‘काल आपण नाही जिंकलो पण तरीही आपण पराभूत झालेलो नाही. गुलजार साहेब यांनी क्रिकेटसाठी लिहिलेले हे गीत (आकाश के उस पार) मी आपल्या संघासाठी समर्पित करत आहे.’

न्यूझीलंडने भारताविरुद्ध या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 240 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आवस्था 6 बाद 92 धावा अशी होती.

परंतू या परिस्थितीतून भारताला सावरताना धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. मात्र हे दोघेही महत्त्वाच्या क्षणी लागोपाठच्या षटकात बाद झाले. जडेजाने 77 धावांची खेळी तर धोनीने 50 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीच्या निवृत्तीबद्दल कर्णधार विराट कोहलीने केले मोठे भाष्य

व्हिडिओ: विलियम्सन म्हणतो, ‘…तर धोनीची न्यूझीलंडच्या संघात निवड करु’

एमएस धोनीने ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागील कोहलीने केले स्पष्ट कारण