महान टेनिसपटू रॉजर फेडरर ‘लॉरस’ पुरस्काराने सन्मानित

महान टेनिसपटू रॉजर फेडररला ‘लॉरस’ या प्रतिष्ठित पुरस्काराच्या १८व्या आवृत्तीमधील ‘स्पोर्ट्समन ऑफ दि इयर’ आणि ‘कमबॅक ऑफ दि इयर’ हे दोन पुरस्कार मिळाले.

फेडररकडे हे दोन पुरस्कार मिळून एकूण असे सहा पुरस्कार झाल्याने तो लॉरस पुरस्कार इतिहासातील सर्वोत्तम विजेता ठरला आहे.  

फेडररने ‘स्पोर्ट्समन ऑफ दि इयर’ या पुरस्कारात राफेल नदाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना कडवी झुंज दिली.

यावेळी फेडरर म्हणाला, ‘हा माझ्यासाठी एक विषेश क्षण आहे. प्रत्येकाला माहीत आहे की हा पुरस्कार माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, म्हणून तो जिंकणे खूप चांगले पण एकाच वेळेत दोन पुरस्कार जिंकणे हा खरोखरच आदर आहे. माझ्यासाठी हे एक अविस्मरणीय वर्ष होते. कारण २०१६ नंतरच्या कठिण पुनरागमणानंतर हे दोन पुरस्कार त्याला आणखी संस्मरणीय बनवतो.”

फेडररने पुरूषांच्या गटात पुरस्कार पटकावले तर सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. 

हे तिचे 23व्या ग्रॅंड स्लॅम होते. म्हणून सेरेनाने लॉरसचा’स्पोर्ट्सवूमन ऑफ दि इयर’ हा पुरस्कार जिंकला.

सेरेनाने गेल्यावर्षी मुलीला जन्म दिला. आत्ता तिच्याकडे लॉरस पुरस्काराच्या एकूण पाच प्रतिमा आहेत.