चौथी कसोटी- भारताला पहिल्याच सत्रात मोठा धक्का

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे.

केएल राहुल २४ चेंडूत १९ धावा करुन तंबुत परतला आहे. त्याला स्टुअर्ट ब्राॅडने पायचीत केले आहे.

कालच्या बिनबाद १९वरुन पुढे खेळण्यासाठी सुरुवात करणाऱ्या भारताला आज ३७ धावांवर असतानाच पहिला धक्का बसला.

सध्या शिखर धवन १६ तर पुजारा २ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात २४६ धावा करणाऱ्या इंग्लंडकडे सध्या २०४ धावांची आघाडी आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

 याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

 टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील