पेस-राजा जोडीला एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेचे विजेतेपद

लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत जेम्स केरेत्तनी-जॉन पॅट्रिक स्मिथ जोडीचा ७-६(७-४), ७-६ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पेस-राजा जोडीला या स्पर्धेत आग्रमानांकन होते. त्यांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोडीला ७-६,६-३ असे पराभूत करत अशा उंचावल्या होत्या.

ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकत्र खेळायला सुरुवात केल्यापासून ह्या जोडीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. यावर्षी लिएंडर पेस तीन चॅलेंजर विजेतेपदं जिंकला आहे. त्यात त्याचे आदिल शमदीनआणि अमेरिकन स्कॉट लिप्सकी हे जोडीदार राहिले आहेत.

पूरव राजाचे हे यावर्षीचे दुसरे विजेतेपद असून त्याने बोड्यरु चँलेंजरचे विजेतेपदमध्ये दिवीज शरण सोबत विजेतेपद पटकावले होते तर चेन्नई ओपन या एटीपी वर्ल्ड टूर २५०मध्ये ते उपविजेते राहिले होते.