लिएंडर पेसने भारताची मान उंचावली, केला ना भुतो ना भविष्यती विक्रम

भारतीय संघातील महान खेळाडू लिएंडर पेसने अभिमानास्पद कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. त्याने डेविस कपमध्ये सर्वाधिक लढती जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 

लिएंडर पेसने रोहन बोपण्णा सोबत डेविस कपमध्ये जोडी जमवत चीनच्या मो झिंग गोंग आणि झे झांग या जोडीला ५-७, ७-६(५), ७-६(३) असा जिंकला. यामुळे भारतीय संघाचे अाव्हान या गटात कायम राहिले आहे. 

काल पहिल्या दिवशी भारतीय संघ दोन्हा लढतीमध्ये पराभूत झाला होता. त्यामूळे आज तमाम टेनीस शौकीनांचे लक्ष या लढतीकडे लागले होते. 

लिएंडर पेसचा हा डेविस कपमधील ४३वा विजय ठरला. त्याला हा विक्रम पुण्यात करण्याची संधी होती परंतू त्याला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच पुढच्या दोन लढतीमध्ये त्याला भारतीय संघात स्थान देण्यात अाले नव्हते. 

त्यामुळे त्याचा हा विक्रम तब्बल १५ महिने लांबला होता. 

 

जागतिक गटाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारताला आता परतीचे सामने जिंकणे गरजेचे आहे. 

१९९० साली हा दिग्गज खेळाडू आपला पहिला डेविस कप सामना खेळला होता. तेव्हा त्याचा जोडीदार होता सध्याच्या भारतीय डेविस कप संघाची कोच झीशान अली तर डेविस कप तो अनेक सामने ंमहेश भूपती सोबत खेळला. भूपती आता डेविस कप संघाचा कर्णधार आहे. 

महेश भूपतीबरोबर तब्बल २४ सामन्यात ही जोडी डेविस कपमध्ये अपराजीत राहिली होती. 

इटलीचे माजी खेळाडू निकोला पिट्रंगेली यांनी डेविस कपमध्ये ४२ विजय मिळवले आहे. गेली अनेक वर्ष हा विक्रम त्यांच्या नावावर होता. 

वयाच्या १६ वर्षी या खेळाडूने डेविस कपमध्ये पहिला सामना खेळला होता तर आज त्याचे वय आहे ४४.