रामकुमारने मानले फेडररचे आभार

भारताचा २२ वर्षीय टेनिसपटू रामकुमार रामनाथनने काल जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावर असणाऱ्या डॉमिनिक थियमला सरळ सेटमध्ये पराभूत करून अंटालिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे या टेनिसपटूवर संपूर्ण भारतातून जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत २२२व्या स्थानावर असणाऱ्या रामकुमारकडून कुणीही एवढ्या मोठ्या कामगिरीची अपेक्षा ठेवली नव्हती. त्यात डॉमिनिक थिएम हा सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्याने ह्याच वर्षी नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले आहे.
६-३,६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत रामकुमार दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे.

यावेळी रामकुमारने ट्विटरच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले. परंतु त्याने खास आभार मानले आहे ते भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसचे.

आपल्या या खास ट्विटमध्ये रामकुमार म्हणतो, ” धन्यवाद लिएंडर, तू नेहमीच मला पाठिंबा दिला आहेस. आणि कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवला आहे. ”

भारताच्या महान टेनिसपटू अर्थात लिएंडर पेसने कायमच त्याच्यापेक्षा वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या रामकुमार रामनाथनला पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या केपीआयटी एटीपी स्पर्धेत हे दोन खेळाडू दुहेरीमध्ये एकत्र खेळले होते. .