रोहित शर्माने एबी डिव्हिलिअर्सचा मोडला हा विक्रम

कानपुर । भारताचा सलामीवीर रोहित शर्माने काल न्यूझीलँडविरुद्ध खेळताना वनडेत कमी डावात १५० षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. हा कारनामा करताना त्याने स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकले. 

रोहित शर्माने १७१ वनडे सामन्यात १६५ डावात फलंदाजी करताना १५० षटकार खेचले आहेत. या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी अव्वल स्थानी असून त्याने १६० वनडेत हा विक्रम केला होता तर एबी डिव्हिलिअर्सने १७६ सामन्यात १५० षटकार खेचले होते. 

यापूर्वी भारताकडून कमीतकमी डावात  १५० षटकार खेचण्याचा पराक्रम धोनीच्या नावावर होता. त्याने १९२ डावात हा कारनामा केला होता. 

कमीतकमी डावात १५० षटकार खेचणारे खेळाडू 
१६० शाहिद आफ्रिदी 
१६५ रोहित शर्मा 
१७६ एबी डिव्हिलिअर्स
१८९ ख्रिस क्रेन्स 
१९२ एमएस धोनी, ब्रेंडन मॅक्कुलम
१९८ ख्रिस गेल