एमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य

भारतीय संघाच्या पुढिल महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी आज भारताच्या वनडे, टी20 आणि कसोटी मालिकांसाठी संघ जाहीर झाले आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा नियमीत यष्टीरक्षक एमएस धोनी या विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे त्याने अधीच कळवले असल्याने तीन्ही प्रकारात रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून पसंती मिळाली आहे.

भारतीय संघाची घोषणा करताना निवड समीती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी तयार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर एमएस धोनीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी धोनीशी चर्चा केली आहे. तसेच निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

प्रसाद म्हणाले, ‘धोनी या विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध आहे. त्याने त्याच्या अनुपलब्धेबद्दल कळवले आहे. आम्ही विश्वचषकासाठी निश्चित योजना आखली होती. त्याचप्रमाणे विश्वचषकानंतरही आम्ही काही योजना आखल्या आहेत.’

‘आम्ही रिषभ पंतला तयार करण्यासाठी त्याला जस्तीत जास्त संधी देण्याचा विचार केला आहे. सध्यातरी हीच आमची योजना आहे. आम्ही धोनीशी चर्चा केली आहे.’

त्याचबरोबर धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रसाद म्हणाले, ‘निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे. धोनीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूला कधी निवृत्ती घ्यायची हे माहित आहे. पण भविष्याबाबत निर्णय घेण्याचे निवड समीतीच्या हातात आहे.’

भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी या रेजिंमेंटबरोबर पुढिल 2 महिने वेळ घालवणार असल्याने त्याने त्याची विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्धता व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर पंतला यापुढे तयार करणार असल्याचे सांगताना प्रसाद यांनी पंत तीन्ही प्रकारात खेळणार असल्याने त्याच्यावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही सांगितले.

विंडीज दौऱ्यासाठी असा आहे भारताचा संघ –

टी20 मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी.

वनडे मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा

विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी

डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट