प्रीमियर लीग: लीव्हरपूलचा सलग चौथा विजय

प्रीमियर लीगमध्ये किंग पॉवर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लीव्हरपूलने लीसेस्टर सिटीचा २-१ने पराभव केला. लीव्हरपूलने या लीगमधील पहिल्यांदाच पहिले चारही सामने जिंकले आहे.

यावेळी सॅदियो मॅनेने १०व्या मिनिटाला गोल करत लीव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जिंकलेल्या या चारही सामन्यात मॅनेने प्रत्येकी एक गोल केला आहे.

२३व्या मिनिटाला लीव्हरपूलचा गोलकिपर अॅलिसन बेकरने सिटीचा मिडफिल्डर देमाराइ ग्रेचा गोल रोखला.

लीव्हरपूलसाठी दुसरा गोल  ४५व्या मिनिटाला आला. यावेळी जेम्स मिलनेरच्या असिस्टवर रोबर्तो फिरमिनोने गोल करत पहिल्या सत्रात संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याचप्रमाणे मिलनेरने डेव्हीड बेकमहच्या लीगमधील ८० गोल असिस्ट करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

दुसरे सत्र सुरू झाले असता सिटीने आक्रमक खेळाला सुरूवात केली. यावेळी जेम्स मॅडिसन हा दुसऱ्या सत्रात काही आक्रमक स्वरूपात दिसत होता. पण त्याला पिरमिनोनो रोखले. याच्या आधीही सिटीला गोल करण्याची संधी होती पण बेकरने केलेली चूक सुधारत डिफेंडर जोइ गोमेझने त्यांचा गोल अडवला.

मिडफिल्डर हशिद गेझालने ६३व्या मिनिटाला सिटीचे खाते उघडले. तसेच सामनावीराचा पुरस्कार गोमोझला मिळाला.

मागील हंगामात या स्टेडियमवर झालेल्या चार सामन्यात लीव्हरपूलला फक्त एकदाच विजय मिळवता आला होता.

लीव्हरपूलचा पुढील सामना टोटेनहॅम हॉट्सपरशी १५ सप्टेंबरला आहे. या लीगमध्ये लीव्हरपूल पहिल्या तर टोटेनहॅमने पण तीनही सामन्यात विजय मिळवला असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

कर्णधार बदल प्रकरण भोवले, संजू सॅमसनला होणार मोठी शिक्षा

असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट