वाचा: निवृत्तीनंतर नेहरा काय करणार ??

दिल्ली| भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने निवृत्तीनंतर पुढे त्याच्या आयुष्यात तो काय करणार आहे याबद्दल आपले मत मांडले आहे. नेहराने आजपर्यंत फक्त क्रिकेटला महत्व दिलेले आहे. त्यामुळे त्याला निवृत्तीनंतर काय असा प्रश्न विचारला जाणार हे साहजिक होते.

या प्रश्नाचे उत्तर देताना नेहरा म्हणाला “मला माहित नाही पुढे काय येणार आहे. मी अजून तरी पुढे काय करायचे याचा निर्णय घेतलेला नाही. कदाचित मी प्रशिक्षक होईल किंवा कदाचित समालोचक”

नेहरा काल न्यूझीलंड संघाविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात भारतीय क्रिकेट बोर्डाने नेहराला ट्रॉफी देऊन सन्मानित केले होते.

सामना संपल्यावर दिल्लीकर शिखर आणि विराटने त्याला खांद्यावर उचलून घेऊन मैदानात चक्कर मारली आणि भारतीय संघाने नेहराबरोबर फोटो काढत त्याच्या शेवटचा सामना साजरा केला. हा टी २० सामना भारतीय संघाने ५३ धावांनी जिंकला.

आशिष नेहराने १८ वर्षांच्या कारकिर्दीत १६४ सामने खेळताना २३५ बळी घेतले आहेत. त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण २४ फेब्रुवारी १९९९ साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.