विराट कोहलीची फॅन आहे जॉटी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’

विराट कोहली आणि त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडिया, क्रिकेट मैदान, हॉटेल्स सगळीकडे भारताच्या या कर्णधाराबद्दल चर्चा सुरु असतात. आता त्यात नवीन भर पडली आहे ती इंडियाची. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉटी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’ ही कोहलीची मोठी फॅन आहे.

त्याबद्दलचा ट्विट काल जॉटी ऱ्होड्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरून केला. त्यात ‘इंडिया’ विरटाच्या पोस्टरजवळ उभी आहे.

या ट्विटमध्ये जॉटी म्हणतो, ” असं वाटतंय विराटला आणखी एक फॅन मिळाला आहे. परंतु त्यासाठी आपण ‘इंडिया’ ला जबाबदार नाही धरू शकत.”

त्यावर उत्तर देताना भारताचा हा कर्णधार म्हणतो, ” क्युटनेस ओव्हरलोड! विशेष आहे त्या छोट्या बॅगमध्ये ती काय घेऊन जात असेल”

 

‘इंडिया’ २३ एप्रिल रोजी २ वर्षांची झाली तेव्हा पंतप्रधान मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या होत्या. २०१५ साली आयपीएल मोसमातच भारतातच मुलगी झाली. भारतीयांचं प्रेम आणि त्यात मुलीचा जन्म भारतात झाल्यामुळे तीच नावही ‘इंडिया’ ठेवण्यात आलं आहे.

सध्या ‘इंडिया’ भारत दौऱ्यावर असून जॉटी ऱ्होड्सबरोबर आयपीएल सामन्यांचा आनंद घेत आहे.