चॅम्पियन्स ट्रॉफी: बार्सेलोनाची विजयी सुरुवात; जुवेन्टसला नमवले

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात काल बार्सेलोना संघाने जुवेन्टस संघाचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात बार्सेलोना संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात लियोनेल मेस्सीने २ तर इवान रॅकिटीक याने १ गोल नोंदवला. बार्सेलोनासाठी इनिएस्टा ,सुआरेज, मार्क टेर स्टेगेन आणि डेमबाले यांनी उत्तम कामगिरी करत सामन्यावर आपली छाप सोडली.

सामन्याच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला ज्युव्हेंटस संघ थोडा आक्रमक दिसला. या सामन्यातील पहिली आक्रमक चाल याचा संघाने खेळली. पण त्याला बार्सेलोनाच्या गोलकीपर मार्क टेर स्टेगेन याने यश मिळू दिले नाही. १९ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाला फ्री किक मिळाली.मेस्सीने मारलेली किक जुवेंटस्च्या रक्षकाने अडवली. त्या रिबॉउंड वर सुआरेजने उत्तम किक केली पण जुवेन्टसचा गोलकीपर बुफॉन अप्रतीम बचाव केला.

काही मिनिटे या सामन्यात जुवेंतूस संघाने धुसमुसला खेळ केला त्यामुळे त्यांना एलो कार्ड मिळाली. मेस्सीने विरोधी खेळाडूच्या क्षेत्रात नियमित दबाब निर्माण केला. त्याने ३८ व्या मिनिटाला डेमबाले याच्यासाठी गोल करण्याची उत्तम संधी निर्माण केली परंतु डेमबाले गोल करण्यात अपयशी ठरला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत असे चित्र असताना मेस्सीने सुआरेज सोबत वन टू वन पासेस खेळले आणि डाव्या पायाने गोलच्या उजव्या कोपऱ्यात उत्तम गोल केला. पहिले सत्र संपले तेव्हा बार्सेलोना संघ १-० असा आघाडीवर राहिला.

दुसऱ्या सत्रातच्या सुरुवातीला जुवेन्टसचा मुख्य स्ट्रायकर पाउलो डिबाला याने गोल करण्याचा प्रयन्त केला परंतु बार्सेलोनाच्या गोलकिपरने तो प्रयन्त हाणून पडला. ५२ व्या मिनिटाला मेस्सीने बॉक्सच्या बाहेरून मारलेली किक गोलपोस्टला जाऊन धडकली. त्यामुळे मेस्सीचा प्रयन्त असफल झाला. पाच मिनिटानंतर मेस्सीने चाल रचली आणि बॉल क्रॉस करत बॉक्समध्ये टाकला. जुवेंट्सच्या बचावपटूने तो कसाबसा बाहेर ढकलला. त्यावर इवान रॅकिटीकने गोल केला. त्या गोलच्या जोरावर बार्सेलोना संघाने २-० अशी आघाडी मिळवली.

उत्तम लयीत असणाऱ्या मेस्सीने ६८व्या मिनिटाला उजवीकडून ड्रिब्लिंग करत चेंडू गोल पोस्टच्या बरोबर समोर आणला. बॉक्सबाहेर दोन डिफेंडर्सला चकवत त्याने आपला दुसरा आणि बार्सेलोना संघाचा तिसरा गोल केला. यानंतर सामन्यात अन्य गोल होऊ शकला नाही. बार्सेलोनाने हा सामना ३-० असा जिंकला.

यदाकदाचित तुम्हाला माहिती नसेल तर-

#१ लियोनला मेस्सीने या अगोदर कधीही जुवेन्टसच्या गोलकीपर बुफॉन याच्याविरुद्ध गोल नोंदवला नेता. त्याने या सामन्यात दोन गोल नोंदवत गोल न करण्याची मालिका खंडित केली.

#२ लियोनेल मेस्सीचे चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यात आता एकूण ९६ गोल झाले आहेत. तो सर्वाधीक गोल करण्याच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर १०५ गोल आहेत.

#३ या खूप मोठ्या सामन्यात जुवेन्टसच्या प्रशिक्षकांनी बदली खेळाडू म्हणून १७ वर्षीय फॅब्रिजिओ कॅलिगरा या खेळाडूला पदार्पणाची संधी दिली.

#४ लियोनेल मेस्सी १८ वर्षाचा असताना जुवेन्टस संघाविरुद्ध बार्सेलोना संघाकडून खेळाला होता. त्यसामन्यांतील त्याचा खेळ आणि वेग पाहून तो उद्याचा खूप मोठा खेळाडू होईल असे भाकिते फ़ुटबाँल विश्वातील अनेक जाणकारांनी केली होती. त्या सामन्यापासूनच मेस्सी प्रसिद्धीच्या झोकात आला होता.