मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम

बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील ३३वा चषक जिंकून  क्लबच्या इतिहासात तो सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. यावेळी ला लीगा चॅम्पियन्सने सेव्हिलचा २-१ असा पराभव करून स्पॅनिश सुपर कप जिंकला.

या सामन्यात बार्सिलोनाचा गोलकिपर मार्क-आंद्रे टेर स्टेजन याने ९०व्या मिनिटाला पेनाल्टी रोखली तर जेरार्ड पीके आणि ओस्माने डेंबेले यांच्या गोलमुळे बार्सिलोनाने या हंगामातील पहिला चषक जिंकला. तसेच सेव्हिलकडून पॅब्लो साराबियाने ९व्या मिनिटाला गोल केला.

तसेच याच आठवड्यात मेस्सीने आंद्रेस इनिएस्ताकडून बार्सिलोनाच्या कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली आहे. इनिएस्ताने ३२ विजेतेपद जिंकली असून तो सध्या जपानच्या विसेल कोबकडून खेळत आहे.

मेस्सीचा पहिला चषक २००४-०५चा लालीगाचे विजेतेपद होते. तसेच त्याने सहा स्पॅनिश कप, सात स्पॅनिश सुपर कप, तीन युरोपियन सुपर कप आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत.

स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम सामन्यात मेस्सीने केलेल्या फ्री-किकचे पीकेने गोलमध्ये रूपांतर केले. यामुळे पहिल्या सत्रात सामना १-१ असा बरोबरीत आला.

डेंबेलेने ७८व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या दुसऱ्या सत्रात सेव्हिलला गोल करण्याची संधी होती पण स्टेजनने शेवटच्या मिनिटाला विसॅम बेन येदरची पेनाल्टी रोखली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती

नदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार