फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या पुतळ्याची तोडफोड

अर्जेटिना । फुटबॉलच्या मैदानावरील जादूगार समजला जाणारा अर्जेंटिनाचा सुप्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सीच्या पुतळ्याची पुन्हा तोडफोड करण्यात आली आहे. ह्या पुतळ्याची तोडफोड करण्याची अठरा महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.

‘पसेओ दे ला ग्लोरिया’ येथे मागील वर्षी जुन महिन्यात मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. ब्रॉन्झ धातू पासून बनवलेल्या पुतळ्याची ह्या वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्यांदा तोडफोड करण्यात आली होती.

‘स्पोर्ट्स पार्क’ असे समजल्या जाणाऱ्या पसेओ दे ला ग्लोरिया येथे मेस्सी बरोबर टेनिस प्लेयर गॅब्रेल सॅबॅटिनी, बास्केटबॉल प्लेयर मानुएल जिनोबिली यांचे देखील पुतळे येथे उभारण्यात आले आहेत.

यापूर्वी टेनिस प्लेयर गॅब्रेल सॅबॅटिनीचे टेनिस रॅकेट ही येथून चोरीला गेले होते. ह्या अश्या वेळोवेळी होणाऱ्या घटना वरून पोलीस पुतळ्यांचे रक्षण करण्यात कमी पडत आहेत. पोलिसांकडून ह्या घटने मागील सूत्रदार अजून हाती लागला नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत मेस्सीने इक्वाडोर संघाविरुद्ध हॅट्रिक साधून अर्जेटिनाचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. पाच वेळा ‘सर्वोत्कष्ट फुटबॉल प्लेयर’ असा किताब पटकवलेला मेस्सी २००० सालापासून बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल खेळात आहे.