लग्नानंतर राहिलेलं अन्न मेस्सीने गरिबांना वाटलं!

फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातील ताईत अशी ओळख असणाऱ्या लिओनेल मेस्सीने लग्नानंतर शिल्लक राहिलेलं अन्न आणि ड्रिंक्स हे ‘चॅरिटी’ साठी दिले. गेल्या आठवड्यात हा फुटबॉल दिग्गज बालपणीच्या मैत्रिणीशी विवाहबद्ध झाला.

रोसारिओ या अर्जेन्टिनामधील शहरात मेस्सी अँतोनेल्ला रॉकझझो या बालमैत्रिणीशी विवाहबद्ध झाला. हा विवाह सोहळा शतकातील सर्वात मोठा विवाह सोहळा म्हणून गणला गेला.

या शहरातच असणाऱ्या रोसारिओ फूड बँकला मेस्सीचे राहिलेलं अन्न आणि ड्रिंक्स दिले. लग्नसोहळा आणि त्यांनतर झालेल्या पार्टी नंतर मेस्सीने स्वतः याची खात्री केली की काहीही वाया जाणार नाही.

रोसारिओ फूड बँकचे मुख्य असलेले पाब्लो ऑग्रिन म्हणाले, ” राहिलेलं सर्व अन्न हे फूड बँकमध्ये आले. परंतु ते नक्की किती आहे हे अजूनही आम्हाला माहित नाही. आम्ही आयोजकांना सांगितलं की आम्ही सॉफ्ट ड्रिंक आणि स्नॅक्स घेतो. परंतु अल्कोहोलच्या बदल्यात आम्ही पैसे घेतो. कारण तसे पदार्थ किंवा ड्रिंक्स आम्ही घेत नाही. ”

PC: www.foxsports.com