आतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त?

स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी अर्जेंटिनाचा पुढील महिन्यात होणारा मैत्रीपूर्ण सामना खेळणार नाही.

तसेच तो २०१८चे राहिलेले वर्ष अर्जेंटिनाकडून खेळणार नसून तो कधी परतेल हे पण निश्चित नाही.

तसेच तो पूढील वर्षी निवृत्ती घेणार का याच्याही चर्चा आता रंगु लागल्या आहेत.

विश्वचषकात अर्जेंटिनाची कामगिरी सुमार झाल्याने संघाचे प्रशिक्षक होर्गे संपाऊली यांना पदावरुन काढून टाकण्यात आले होते. सध्या मेस्सी अर्जेंटिनाचे नवे प्रशिक्षक कोण होतात याकडे लक्ष ठेऊन आहे.

१२८ सामन्यात अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने ६५ गोल केले आहेत तसेच २००८ ला ऑलिम्पिकचे सुवर्णपदक पण जिंकून दिले आहे.

पाच वेळा बलोन दि ओर पुरस्कार जिंकणाऱ्या 31 वर्षीय मेस्सी राष्ट्रीय संघाकडून न खेळण्याचा सध्यातरी विचार करत असल्याचे वृत्त टीएनटी स्पोर्ट्सने दिले आहे.

३१ वर्षीय मेस्सी २०२२च्या विश्वचषकातही खेळू शकतो परंतु त्याचे हे खेळणे प्रशिक्षक होर्गे संपाऊली यांच्या जागी कोण येत आहे यावरच बरेच अवलंबुन असणार आहे.