मेस्सीला २१ महिन्यांची जेल!

फुटबॉल सुपरस्टार आणि बार्सिलोना क्लबचा मुख्य खेळाडू लिओनेल मेस्सीला स्पॅनिश सुप्रीम कोर्टाने २१ महिन्यांची जेल आणि २.२५ मिलियन युरोचा दंड ठोठावला आहे.  टॅक्समध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे ही शिक्षा मेस्सीला सुनावण्यात आली आहे.
मेस्सीबरोबर त्याचे वडील जॉर्ज यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. परंतु त्यांनी टॅक्सची काही रक्कम आधीच भरल्यामुळे त्यांची  ही शिक्षा कमी होईल.
गेल्या वर्षी सुनावणीच्या वेळी मेस्सी म्हणाला होता कि मला किंवा वडिलांना आर्थिक व्यवहार कसे सांभाळावे यातील जास्त काही समजत नाही. त्यावर बुधवारी कोर्टाने आपल्या निकालात असेही म्हटले आहे. ” एवढी मोठी रक्कम कमावणाऱ्या खेळाडूला टॅक्स बद्दल माहित नसते. यापाठीमागे कोणतं लॉजीक असेल. ”

टॅक्समध्ये केलेल्या घोटाळ्याप्रकरणी मेसी आणि जॉर्ज यांना दोषी ठरवून जुलै २०१६ मध्ये प्रत्येकी २१ महिन्यांचा कारावास आणि एकूण ३७ लाख यूरोचा दंड (सुमारे ४१ लाख डॉलर) अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली.

जॉर्ज मेस्सी यांची शिक्षा २१ महिन्यावरून १५ महिने करण्यात आली आहे. तेच मेस्सीचे सर्व आर्थिक व्यवहार पाहत होते.

परंतु यात लिओनेल मेस्सी किंवा जॉर्ज मेस्सी यांना शिक्षा न होता प्रोबेशन खाली ठेवले जाईल कारण २ वर्षाखाली शिक्षा झाली असेल तर स्पॅनिश कायद्याप्रमाणे आरोपीला प्रोबेशन खाली ठेवले जाते.