लियोनेल मेस्सी @१०० युएफा गोल्स

फुटबॉल जगतातील सर्वात गिफ्टेड खेळाडू, अनेक जाणकारांच्या मते आजवरचा सर्वात महान खेळाडू अर्जेन्टिना फुटबॉल संघाचा कर्णधारआणि बार्सेलोना संघाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी याने आज पहाटे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात ऑलंम्पियस संघाविरुद्ध खेळताना एक गोल करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १०० गोल करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.

मागील काही सामान्यांपासून संपूर्ण फुटबॉल विश्वाला या १०० व्या गोलची प्रतीक्षा होती. त्याची या मोसमातील लय पाहता तो १०० वा गोल करण्यास जास्त सामने घेणार नाही याची सर्वांना खात्री होती. अखेर या गोलची प्रतीक्षा घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर संपली.

पहिल्या हाफमध्ये बार्सेलोना संघ १-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये जेराड पिकेने गोल करण्यासाठी हाताचा उपयोग केल्याने त्याला रेड कार्ड देण्यात आले, तो गोलही नाकारला गेला. त्यानंतर १० खेळाडूंनीही खेळणाऱ्या बार्सेलोना संघाला फ्री किक मिळाली. बॉक्सबाहेर मिळालेल्या फ्री किकवर गोल करत मेस्सीने बार्सेलोना संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली त्याच बरोबर स्वतःचा चॅम्पियन्स लीगमधील १०० गोल देखील केला. हा सामना बार्सेलोनाने ३-१ असा जिंकला.

मेस्सीच्या चॅम्पियन्स लीगमधील १०० गोलचा प्रवास कसा झाला हे आपण पाहू.
# लियोनेल मेस्सीचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पदार्पण-
१२२ सामन्यात १०० गोल करणाऱ्या मेस्सीला संघात स्थान मिळूनही आपले पदार्पण करण्यासाठी तब्बल तीन सामने राखीव खेळाडू म्हणून बसून रहावे लागले. त्यानंतर त्याला शक्तार डॉन्सटक विरुद्ध ७ डिसेंबर २००४ रोजी वयाच्या १७व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली.
#मेस्सीचे १०० गोल – उजव्या पायाने १६
– डाव्या पायाने ८० ( ५ फ्री कीक, ९ पेनल्टी )
– हेडर ०४

# पहिल्या गोलसाठी मोठी प्रतीक्षा –
पदार्पणनंतर त्याला संघात नियमित संधी मिळाली परंतु त्याला पहिल्या गोलसाठी खुप प्रतीक्षा करावी लागली. सलग चार सामन्यात गोलचा दुष्काळ त्याने पाचव्या सामन्यात संपवला. २ नोव्हेंबर २००५ रोजी बार्सेलोनाने या सामन्यात पंथींनाकोस या संघाचा ५-० असा धुवा उडवला होता.

# गोलची प्रगती –
१- २० गोल, ४२ सामने
२१-४०-२१
४१-६०-१८
६१-८०-२३
८१-१००-१८ सामने

# हॅट्रीकचा बादशहा –
मेस्सीच्या नावावर क्रिस्टियानो रोनाल्डोसह संयुक्तपणे चॅम्पियन्स लीगमध्ये ७ सर्वाधिक हॅट्रिक आहेत. यामध्ये त्याने ६ एप्रिल २०१० साली आर्सेनल विरुद्व लगावले ४ गोल हा सामना बार्सेलोनाने ४-१ असा जिंकला होता. त्यांच्याबरोबर चॅम्पियन्स लीगमध्ये एकाच सामन्यात पाच गोल करण्याचा विक्रम करताना ७ मार्च २०१२ रोजी लिव्हरकुसेन संघासोबत लगावले. ५ गोलचा यामध्ये समावेश आहे. हा सामना बार्सेलोनाने ७-० असा जिंकला होता. त्याच बरोबर, मागील मोसमात साखळी सामन्यात सेल्टिक आणि मँचेस्टर सिटी विरुद्ध सलग हॅट्रीक करण्याचा विक्रम देखील केला आहे.

#मेस्सीचे एका संघाविरुद्धचे सर्वाधीक गोल-
आर्सेनल-०९
एसी मिलान -८
सेल्टिक -८
बायर लेवरकुसेंन -७
मँचेस्टर सिटी -६
अजॅक्स -६

# केम्प नाऊ ( बार्सेलोना संघाचे घरचे मैदान )सर्वात आवडते मैदान-
घरच्या मैदानावर मेस्सी कोणताही सामना खेळतो त्यात गोल जवळ जवळ निश्चित असतो. त्यामुळे हे मैदान मेस्सीचे आवडते मैदान आहे. १०० पैकी ५५ गोल त्याने घरच्या मैदानावर मारले आहेत. ५ गोल त्याने तटस्थ ठिकाणी लगावले आहेत तर उर्वरित ४० गोल त्याने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर लगावले आहेत.

#चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फेऱ्याप्रमाणे गोलचे वितरण-
ग्रुप स्टेज – ६० गोल ( विक्रम )
राऊंड ऑफ १६- २१ (विक्रम )
उपउपांत्यपूर्व फेरी – १० गोल
उपांत्य फेरी – ४ गोल
अंतिम फेरी – ५ गोल

# संघाच्या विजयात भूमिका –
मेस्सीने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात गोल केला तर विरोधी संघासाठी सामना तिथेच संपलेला असतो. मेस्सीने गोल केला तर बार्सेलोना ८४टक्के तो सामना जिकंतो.
#मेस्सीने गोल केलेल्या सामन्यात बार्सेलोना –
५२ वेळा जिंकले,
७ वेळा सामना बरोबरीत सुटला ,
३ वेळा पराभव

युएफाच्या सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक गोल करणारे खेळाडू-
१ क्रिस्टियानो रोनाल्डो-११३ गोल, १५१ सामने
२ लियोनल मेस्सी- १०० (१२२)
३ राउल गोन्झालेझ ७६ (१५८)
४ फिलिपो इन्झगी ७०(११४)
५ आंद्रिय शेचेन्को ६७(१४२)