पहा: त्या चिमुकल्याचे स्वप्न फुटबॉलपटू मेस्सीने केले पूर्ण

विक्रमी पाच वेळेस वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरलेला आणि फूटबॉल विश्वातील अनेक जाणकारांच्या मते आजवरचा सर्वात महान फुटबॉलपटू अर्जेन्टिनाचा लियोनला मेस्सी याने ११ वर्षीय चिमुकल्या उरुग्वयेयन लुसियान याचे स्वप्न पूर्ण केले.

फिफा विश्वचषक जवळ आल्याने त्याच्या पात्रता फेरीच्या सामन्याचे सत्र सर्वत्र चालू आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यासाठी अर्जेन्टिनाचा संघ उरुग्वये मध्ये दाखल झाला. जसे की नेहमीच होते तसे सर्वांचे लक्ष हे अर्जेन्टिनाच्या ‘नंबर १०’ म्हणजे कर्णधार मेस्सी याकडे होते.

हा सामना खेळण्यासाठी अर्जेन्टिनाचा संघ एअर पोर्टवर दाखल झाला. त्यावेळी एक चिमुकला लुसियान हा मेस्सीकडे ऑटोग्राफसाठी धावत आला. मेस्सी समोर त्याला सेक्युरिटीने अडविले आणि परत पाठवले. परत जातताना त्या चिमुकल्या लुसीयानला अश्रू अनावर झाले. तो प्रकार लक्षात येताच मेस्सी तिथेच थांबला. त्याने लुसियानला बोलवून घेतले आणि आपला ऑटोग्राफ दिला. त्यावर बोनस म्हणूस गळाभेट दिली त्यानंतर लुसियान तेथून धावत बाहेर आला.

स्वप्ने खरे होतात …. लुसियानला विचारा

चिमुकला लुसियान लियोनला मेस्सीचा खूप मोठा चाहता आहे. त्याचे एक स्वप्न होते की त्याला मेस्सी बरोबर एक फोटो काढायचा होता आणि एक पत्र भेट द्यायचं, जे त्याने मेस्सीसाठी स्वतः लिहले आहे. एअरपोर्ट वरील सर्व प्रकार झाल्यावर लुसियानला जेथे अर्जेन्टिनाचा संघ विश्रांती करत आहे तेथे बोलविण्यात आले. तेथे त्याचा आवडता खेळाडू त्याची प्रतीक्षा करत होता. त्याने लिओनेल मेस्सी बरोबर फोटो काढला आणि त्याचे पत्र देखील दिले. या प्रकारानंतर देखील त्याचे डोळे ओले होते. स्वप्न पूर्ती नंतर तो धावत त्याच्या काकाकडे गेला.

उरुग्वये आणि अर्जेन्टिना यांचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. आपल्या वैयक्तिक उत्तम खेळाने मेस्सीने या सामन्यात छाप पडली. हा सामना जरी जिंकून देण्यात मेस्सीला यश आले नसले तरी आपल्या चाहत्यासाठी दाखवलेल्या प्रेमामुळे त्याने सर्वांची मने जिंकली. मागील विश्वचषकात अर्जेटिना संघाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते तर लियोनेल मेस्सीला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूला देण्यात येणारा ‘गोल्डन बॉल पुरस्कार’ मिळाला होता.

यदाकदाचित आपणास हे माहिती नसेल तर-

या अगोदरही मेस्सीने चिमुकल्या चाहत्याचे स्वप्न पूर्ण केले होते. अफगणिस्तानचा मुर्तुझा जो मेस्सीच्या जर्सी मधील फोटोमुळे चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे ही जर्सी प्लॅस्टिकच्या पिशवीचे प्लास्टिक वापरून त्याने घरीच बनवली होती. त्या मुर्तुजा याला मेस्सीने प्रत्यक्ष्य भेट तर दिलीच पण त्याला एका प्रदर्शनीय सामन्यासाठी मुर्तुझाला मेस्सीने मैदानात ओळखीसाठी नेले होते.