मेस्सी-रोनाल्डो यांच्यात २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करण्यासाठी चुरस

स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात 2018 वर्षात सर्वाधिक गोल करण्याच्या पहिल्या स्थानासाठी शर्यत सुरू आहे.

मेस्सीने यावर्षी अर्जेंटिना आणि बार्सिलोनाकडून खेळताना एकूण 47 गोल केले आहेत. तर रोनाल्डोने त्याच्यापेक्षा तीन कमी असे 44 गोल केले आहेत. मात्र रोनाल्डोला मेस्सीच्या पुढे जाण्याची संधी आहे. कारण मेस्सीला फक्त एकच सामना खेळायचा असून रोनाल्डोचे तीन सामने खेळायचे बाकी आहेत.

आज (22 डिसेंबर) बार्सिलोनाचा सामना सेल्टा विगो विरुद्ध आहे. तर हा मेस्सीचा या वर्षाचा शेवटचा सामना असून त्याला गोल करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. ला लीगा मध्ये त्याने 16 डिसेंबरला झालेल्या लेवांते विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली होती. ही त्याची ला लीगामधील 31वी हॅट्ट्रीक ठरली आहे. तसेच ला लीगामध्ये 14 गोल करत मेस्सी आघाडीवर आहे.

रोनाल्डोने यावर्षात रियल माद्रीद, पोर्तुगल आणि युवेंट्स कडून खेळताना 44 गोल केले आहेत. तर रोमा (22 डिसेंबर), अटलांटा (26 डिसेंबर) आणि सॅम्पदोरिया (29 डिसेंबर) विरुद्धचे त्याचे सामने बाकी आहेत.

बायर्न म्युनिचचा रॉबर्ट लेवांडोस्कीने यावर्षात 42 गोल केले तर अॅटलेटिको माद्रीदचा अॅटोनि ग्रीझमन हा 38 गोल दोघांचेही एक सामने खेळायचे बाकी आहेत.

मागील वर्षी मेस्सीला दोन गोलने पिछाडीवर टाकणारा टोटेनहॅम हॉटस्परचा हॅरी केनने 37 गोल केले आहेत. त्याचे तीन सामने खेळायचे बाकी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत गमावणार २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद ?

असा आहे बहुचर्चित बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास…

आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी