व्हिडिओ: मेस्सीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

फुटबॉल जगातला दिग्गज बार्सिलोना आणि अर्जेंटीना स्टार लियोनल मेस्सी हा मैदानाच्या आत आणि बाहेर त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्ग पण मोठा असून तो सगळ्याच वयोगटातील आहे.

अशीच मेस्सीची एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये तो रियल बेटीस आणि मेक्सिकोचा मिडफिल्डर अँड्रेस गार्डडो याच्या मुलासोबत खेळत आहे.

ला लीगाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये ही क्लिप दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये गार्डडो हा मेस्सीची वाट बघत असून त्याचा मुलगा मॅक्सिमो हा त्याच्याशी बोलण्यात गुंग आहे. मग जेव्हा मॅक्सिमो मागे वळून बघतो तेव्हा तो ‘मेस्सी’ असे म्हणतो.

तसेच गार्डडोच्या पत्नीने हा व्हिडिओ इंन्टाग्रामवर शेयर केला.

 

रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात अर्जेंटीना संघ बाद फेरीतूनच बाहेर पडला. मेस्सीने या स्पर्धेतील 4 सामन्यात एक गोल तर दोन गोल असिस्ट केले.

तसेच मेस्सी हा सध्या खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65 गोल केले आहेत. तसेच तो पाच बॅलोन दी ओर पुरस्काराचा विजेता आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे

स्म्रीती मानधनाची पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी, ९ षटकांतच जिंकून दिला सामना