हॅप्पी बर्थडे मेस्सी

२४ जून १९७८ रोज़ी अर्जेंटिनामध्ये एका मुलाचा जन्म झाला. तो मुलगा जन्मालाच मुळी फक्त फुटबाॅल खेळायला. देव काही तरी घेतो तर मोबदल्यात खुप जास्त देतो. लहानपणी त्या मुलाच्या हॉर्मोनच्या वृधिमध्ये कमतरता होती पण फुटबाॅल खेळायची जिद्द पण तेवढीच. त्यासाठीच त्याला उपचाराला स्पेनमध्ये नेण्यात आले. पुढे उपचार झाल्यावर तो मुलगा एक मोठा फुटबॉलपटू बनला. त्याचे नाव लिओ मेस्सी जे फुटबाॅल प्रेमींसाठी काही नवीन नाही.

१६ आॅक्टोंबर २००४ साली बार्सालोनासाठी त्याने पदार्पण केले आणि आज १३ वर्षांपासुन एकच क्लब कडुन खेळताना अनेक विक्रम त्याने आपल्या नावे केले. बार्सालोना आणि अर्जेंटीनातर्फे ७०१ सामन्यात ५६५ गोल्स, २३१ असिस्ट आणि ३० ट्राॅफी त्याने जिंकल्या आहेत. ज्यात ८ ला लीगा, ५ कोपा डेल रे, ४ चॅम्पियन्स लीग, ७ स्पॅनिश सुपर क्लब, ३ युरोपियन सुपर क्लब, ३ वर्ल्डकप फाॅर क्लब तसेच फीफा वर्ल्ड आणि आॅलम्पिक गोल्ड मेडल यांचा पण समावेश आहे.
तसेच फुटबाॅलमध्ये सर्वक्षेष्ठ समजल्या जाणार्या बॅलोन डीओर अवॉर्डचा पण तो सर्वाधिक (५) वेळेस मानकरी ठरला आहे. एका वर्षात आणि एका सीजनमध्ये क्लबसाठी सर्वाधिक गोल्स ला लीगामध्ये, सर्वाधिक गोल्स असिस्ट, १ सीजन ला सर्वाधिक गोल्स आणि ३०० गोल्स करणारा प्रथम फुटबाॅलर मेस्सी झाला.

क्लब आणि देशासाठी १ वर्षात सर्वाधिक गोल्सचा (९१ गोल्स २०१२ साली) विक्रम गिनिस वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये मेस्सीच्या नावावर केला आहे. देशासाठी पण सर्वाधिक गोल्स(५८) आणि एक वर्षात देशासाठी सर्वाधिक गोल्स (१२) चा विक्रम पण आपल्या नावावर केला आहे.

अशा या जगातल्या महान फुटबाॅलपटू लिओनल मेस्सीला ३० व्या वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स )