मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….

अर्जेंटीना आणि बार्सिलोनाचा फुटबॉल स्टार लियोनल मेस्सीच्या जीवनवर सिर्क द्यु सोले कंपनी 2019मध्ये शो निर्माण करणार असून त्याचे प्रक्षेपण यु ट्युबवर होणार आहे.

सिर्क द्यु सोले कंपनीने याआधी संगितातील कार्यक्रम सादर केले आहेत. पहिल्यांदाच ते एका फुटबॉल खेळाडूवर शो निर्माण करत आहे. तसेच त्यांनी केलेल्या शोमध्ये बीटल्स, मायकल जॅक्सन आणि अर्जेंटीनाचा रॉक ग्रुप सोदा स्टेरियो यांचा समावेश आहे.

“या शोमध्ये मेस्सीने केलेल्या कामगिरीचा आनंद सिर्क द्यु सोले हे त्यांच्या पद्धतीने साजरा करणार आहेत. तसेच फुटबॉल खेळाच्या संस्कृतीची माहिती दिली जाणार जेणकरून तो खेळ जगात अजून प्रसिद्ध होईल”, असे या कंपनीने म्हटले आहे.

तसेच मेस्सीने या कंपनीसोबत भागीदारी केलेला व्हीडीयो सिर्क द्यु सोलेने यु ट्युबवर टाकला आहे.

“माझ्या आयुष्यवर सिर्क द्यु सोले शो काढणार आहे या कल्पनेने मी खूप आश्चर्यचकित झालो आहे”, असे मेस्सी म्हणाला. याबाबत त्याने इंन्टाग्रामवर पोस्ट शेयर केली आहे.

30 वर्षापूर्वी रस्त्यावर सादरीकरण करणारे सिर्क द्यु सोले या सर्कस कंपनीने 60 देशांमधील 450 शहरांत त्यांची कलाकृती सादर केली आहे. सध्या मेस्सीच्या शोची तारीख निश्चित झाली नाही पण तो पुढील वर्षी येणार हे नक्की.

वयाच्या 13व्या वर्षी बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या मेस्सीने आजपर्यंत क्लबला 30 ट्रॉफीज जिंकून दिल्या आहेत. तसेच पाच वेळा त्याला विविध कार्यक्रमात वर्ल्ड प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडले आहे.

बार्सिलोनाकडून मेस्सीने सर्वाधिक असे 563 गोल असून 650 सामने खेळले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त झॅवी हर्नांडेज (767) आणि आंद्रेस इनियस्ता (674) या दोघांनीच बार्सिलोनाकडून सर्वाधिक सामने खेळले आहेत.

तसेच मेस्सीची यावर्षीच्या फ्रान्स मॅगझिनकडून देणाऱ्या बॅलोन दी’ओर या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे. याआधी त्याने पाच वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मेस्सी, रोनाल्डो यांना मागे टाकत सलाह झाला चाहत्यांचा ‘फेव्हरेट’

फिफा फ्रेंडली: ड्रॅगनच्या देशात मुकाबला असूनही आशा पल्लवित