संपूर्ण यादी: क्रिकेटमधील नवीन नियम

ऑक्टोबर १ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार आहेत. आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या काही नियमांत बदल करून नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली आहे. आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने याला मान्यता दिली आहे.

क्रिकेटचे विशेषकरून वनडे क्रिकेटचे नियम हे १९९२ सालापासून बऱ्यापैकी बदलत आहेत. त्यात वेळोवेळी गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात समतोल राखताना खेळ रटाळवाणा होणार नाही ना याचाही विचार केला जातो. त्यामुळेच बरेच नियम हे कालांतराने बदलून नवीन नियम आणले जातात.

१ ऑक्टोबर पासून जे नवीन नियम येणार आहे त्याची ही यादी

# प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमि, खोली ६७ मिमि तर बॅटची कडा ही ४० मिमि असणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

# मैदानावरील पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास यापुढे पंच त्या खेळाडूला रेड किंवा येल्लो कार्ड दाखवून काही वेळ किंवा पूर्णवेळ मैदानाबाहेर पाठवू शकतात.

# यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात डीआरएस पद्धत वापरली जाणार आहे.

# डीआरएस पद्धत वापरताना तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे. यापुढे डीआरएस वापरताना बॉल ट्रॅकिंग किंवा ऍज डिटेक्टीन्ग तंत्र वापरणे बंधनकारक असेल.

# बऱ्याच वेळा खेळाडूंनी डीआरएस घेतल्यावर मैदानावरील पंचाचा कॉल (अंपायर्स कॉल) म्हणून अपील करणाऱ्या संघाचे अपील फेटाळले जाते. त्यामुळे एक डीआरएस वायाही जातो. यापुढे पंचाचा कॉल(अंपायर्स कॉल ) असेल तर डीआरएस संघाकडे तशीच राहणार आहे.