Live: टोमास बर्डिचवर विजय मिळवत रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत

हे दोन्ही खेळाडू २६वेळा आजपर्यंत समोरासमोर आले असून त्यात फेडररला २० तर बर्डिचला ६वेळा विजय मिळवता आला आहे.

दुपारी ४:२० वाजता: १९ ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश. तब्बल १४व्यांदा फेडररने केला ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश. हा सामना ७०६, ६-३, ६-४ असा जिंकला . २१ वर्षीय कोरियन चुंगशी होणार सेमीफायनलमध्ये लढत.

दुपारी ४:१७ वाजता: टोमास बर्डिचने सर्व्हिस राखली. तिसऱ्या सेटमध्ये ५-४ असा पिछाडीवर. ऑस्ट्रेलियन ओपन २०१८मध्ये रॉजर फेडरर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी करणार सर्व्हिस.यापूर्वी ३ खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले असून फेडरर या फेरीत प्रवेश करणारा अखेरचा खेळाडू ठरणार. गतविजेत्या समोर २१ वर्षीय दक्षिण कोरियाच्या चुंगचे आव्हान असणार. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ४:१३ वाजता: किंग रॉजर फेडररने सर्व्हिस राखली. तिसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ४:११ वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखली. परंतु बेंचवर बसलेल्या टोमास बर्डिचच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसताना. फेडरर सारख्या दिग्गजांसमोर एवढी चांगली सुरुवात करूनही निराशाजनक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु. मैदानात अल्ललेझ अल्लेझ असाच घोष. तिसऱ्या सेटमध्ये फेडररकडे ४-३ अशी आघाडी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ४:०७ वाजता: सर्व्हिस राखत फेडररने तिसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. १९ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विक्रम १४व्या सेमीफायनलचाय दिशेने प्रवास सुरु. कोरियाच्या चुंगविरुद्ध होणार सामना आता दृष्टीक्षेपात. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ४:०३ वाजता: फेडररला या पॉईंटला दोन ब्रेक पॉईंट होते. परंतु त्याने पहिला ब्रेक पॉईंट खूपच सहज गमावला. परंतु पुन्हा दर्जेदार खेळ करत बर्डिचची सर्व्हिस भेदली. यामुळे फेडररने तिसऱ्या सेटमध्ये ३-२ अशी आघाडी घेतली आहे. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ३:५८ वाजता: एका महान खेळाडूविरुद्ध एका हुशार खेळाडूने केलेला कमबॅक. जबरदस्त. १९व्या मानांकित टोमास बर्डिचने रॉजर फेडररची सर्व्हिस भेदली. तिसऱ्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ३:५५ वाजता: तिसऱ्या सेटमध्ये बर्डिचची सर्व्हिस भेदत रॉजर फेडररची १४व्या ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल सुरु. १९वे मानांकन मिळालेल्या बर्डिच साठी सध्यातरी सर्वकाही ठीक होताना दिसत नाही. फेडरर तिसऱ्या सेटमध्ये ३-१ असा आघाडीवर.हा पॉईंट घेताना फेडररने जे काही अपील केले ते फक्त अनुभवी आणि चाणाक्ष खेळाडूच करू शकतो हे पुन्हा एकदा समोर आले. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ३:४६ वाजता: सर्व्हिस राखत बर्डिचने तिसऱ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ३:४६ वाजता: तिसऱ्या सेटमध्ये बर्डिचने सर्व्हिस राखत १-० अशी आघाडी घेतली. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.

दुपारी ३:३६ वाजता: रॉजर फेडररने दुसरा सेट जिंकला. या सेटमध्ये त्याने बर्डिचची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सेट ६-३ असा जिंकला. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:३५ वाजता: बर्डिचची सर्व्हिस भेदत फेडररने दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. या पॉईंटमध्ये फेडररने बर्डिचला कोणतीही संधी दिली नाही. फेडरर आता सेट जिंकण्यासाठी सर्विस करणार आहे. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:२७ वाजता: सर्व्हिस राखत रॉजर फेडररची दुसऱ्या सेटमध्ये ४-३ अशी आघाडी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:२७ वाजता: सर्व्हिस राखत बर्डिचच्या दुसऱ्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे. 

दुपारी ३:२० वाजता: दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखली आहे. फेडरर बर्डिचला प्रत्येक गुणांसाठी झगडायला लावत आहे. यावरूनच त्याच्या कारकिर्दीतील अनुभवाचा तो कसा उपयोग करून घेतोय हे दिसत आहे. २-२ अशी बरोबरी करताना बर्डिचला प्रत्येक पॉईंटमोठी धावपळ करावी लागली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:१२ वाजता: सर्व्हिस राखत रॉजर फेडररची दुसऱ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:१० वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखत १-१ अशी दुसऱ्या सेटमध्ये बरोबरी केली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:०७ वाजता: दुसऱ्या सेटमध्ये चांगली सुरुवात करत फेडररने बर्डिच विरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.

दुपारी ३:०२ वाजता: जबरदस्त कमबॅक करत रॉजर फेडररने पहिला सेट ७-६ (७-१) असा जिंकला.

दुपारी ३:०० वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(६-१) असा आघाडीवर

दुपारी २:५९ वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(५-१) असा आघाडीवर

दुपारी २:५५ वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(३-०) असा आघाडीवर

दुपारी २:५५ वाजता: फेडरर-बर्डिच पहिला सेट ६-६ असा बरोबरीत. रॉजर फेडररचे पिछाडीवरून जोरदार कमबॅक

दुपारी २:४९ वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखत ६-५ अशी आघाडी घेतली.

दुपारी २:४६ वाजता: बॅकहॅन्ड स्लाइसचा फटका मारत फेडररने बर्डिचविरुद्ध पहिल्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी केली.

दुपारी २:४३ वाजता: तब्बल ८ मिनिट चाललेला पॉईंट जिंकत फेडररने बर्डिचची सर्व्हिस भेदली. फेडररने पहिल्या सेटमधील आव्हान राखले. पहिल्या सेटमध्ये बर्डिच ५-४ असा आघाडीवर

दुपारी २:३२ वाजता: रॉजर फेडररने सर्विस राखत पिछाडी ३-५ अशी कमी केली. बर्डिच सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस करणार

दुपारी २:२९ वाजता: रॉजर फेडरर पहिल्या सेटमध्ये बर्डिच विरुद्ध २-५ असा पिछाडीवर

दुपारी २:०० वाजता: रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरु