काॅटिन्होला बार्सिलोना या आठवड्यातच करारबद्ध करण्यास उत्सुक

ट्रान्सफर विंडो चालू झाली आणि लिवरपुलने ७५ मिलियन पाऊंड देऊन डिफेंडर विरगील वॅन डिज्क ला साऊथ्यॅम्पटनकडून घेतले. या मौसमातील ही पहिली ट्रान्सफर होती आणि त्यासाठी मोजलेली रक्कमही विक्रमी होती. या बरोबरच सर्वात महागडा डिफेंडर घेण्याचा मान सुद्धा लिवरपुलने दिला.

त्याबरोबरच मागील ट्रान्सफर पासुन चालू असलेल्या फिलिप काॅटिन्होच्या बार्सिलोनाकडे जाण्याच्या चर्चेला उधाण आले. त्या चर्चेला खतपाणी घालायचे काम केले ते नायकेच्या चुकीच्या जाहीरातीमुळे. त्यांनी आधीच काॅटिन्होची जर्सी विकायला सुरुवात केली आणि सगळ्यांना धक्का बसला.

यावर बार्सिलोनाचे अध्यक्ष बार्टेम्यु यांनी स्पोर्टया स्पेनच्या वृत्तपत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले मी माझ्या परिवारासोबत २०१७ चे शेवटचे काही तास घालवत असताना मला माझ्या सहकारीने फोन करुन नायकेच्या सर्व घटनेबद्दल माहिती दिली.

मी सांगीतले हे सर्व खरे नाही नायके आणि बार्सिलोना २० वर्षापेक्षा अधिक काळापासून सोबत काम करत आहे आणि बार्सिलोनाच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन नायके आहे. मी त्वरित स्पेनच्या नायकेच्या हेडला फोनवरुन झालेल्या प्रकाराबद्दल मत व्यक्त केले. त्यानंतर लगेचच ती जाहिरात नायकेने काढली.

या चुकीमुळे लिवरपुलने कोर्टात तक्रारतर केलीच आहे पण आता काॅटिन्हो साठी १५० मिलियन युरोची मागणी करणार अशी चर्चा आहे. आज कदाचित बार्सिलोना ११० मिलियन निश्चित आणि ४० मिलियन अस्थिर असा १५० मिलियनचा प्रस्थाव ठेवू शकतात.

काॅटिन्होला आता लिवरपुल कडून कोणताच सामना खेळायचा नाही. त्याला या आठवड्यातच बार्सिलोनाकडे यायची इच्छा आहे. त्याच्यासोबतची चर्चा आधीच झाली असुन तो बार्सिलोना बरोबर ५ वर्षासाठी करारबद्ध होणार आहे. त्याला एका मौसमाचे १४ मिलियन युरो देणार आहेत.