चॅम्पियन्स लीग: रोबेर्तो फिरमिनोच्या गोलने लीव्हरपूलचा थरारक सामन्यात विजय

चॅम्पियन्स लीगमध्ये रोबेर्तो फिर्मिनोने उशिरा केलेल्या गोलमुळे या थरारक सामन्यात लीव्हरपूलने पॅरीस सेंट-जेर्मैनवर (पीएसजी) 3-2 असा विजय मिळवला.

फिर्मिनोचा हा या लीगचा लीव्हरपूलकडून 12वा गोल ठरला आहे. यावेळी त्याने लीव्हरपूलकडून सर्वाधिक गोल करण्यामध्ये डर्क क्युट (12), टेरी मॅकडर्मोट (12) यांना मागे टाकले. तर स्टीवन जेरार्ड (30) आणि इयान रश (14) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मोहमद सालाह (11), पीटर क्राउच (11), लुइ गॅर्सिया (10) आणि सादियो मॅने (10) हे पण या शर्यतीत आहेत.

फिर्मिनोचा हा लीव्हरपुलकडून 150वा सामना होता. या सामन्याच्या अधिक वेळेत 91व्या मिनिटाला पीएसजीच्या तीन डिफेंडर्सना चकवत त्याने हा विजयी गोल केला. त्याला टोटेनहॅम हॉट्स्पर विरुद्धच्या सामन्यात डोळ्याच्या दुखापतीने सामना अर्धवट सोडवा लागला होता.

या सामन्याच्या पहिल्या सत्राच्या 36 मिनिटांतच लीव्हरपूलला डॅनियल स्टरीजने केलेला हेडर शॉट आणि जेम्स मिल्नेरच्या पेनाल्टीने त्यांना 2-0 अशी आघाडी मिळाली.

डिफेंडर थॉमस म्युनिएरने 4 मिनिटांच्या फरकाने गोल करत पीएसजीचे खाते उघडले. तरीही पहिल्या सत्रात पीएसजी पिछाडीवर होते.

तसेच या थरारक सामन्यात 19 वर्षीय कायलिन एमबाप्पेने 83व्या मिनिटाला गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. मात्र फिरमिनोने अधिक वेळेत केलेल्या गोलने लीव्हरपूलने हा सामना जिंकला.

मागच्या हंगामात लीव्हरपूल अंतिम फेरीत पोहचला नव्हता. या विजयाने लीव्हरपूल ग्रुप सी मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर त्यांचा या लीगचा पुढील सामना नॅपोली विरुद्ध 4 ऑक्टोबरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का

Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट