टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेसाठी पुण्याच्या अर्जुन कढे वाईल्ड कार्ड

पुणे । पुण्याचा अर्जुन कढे याला एकेरीत वाईल्ड कार्डद्वारे विशेष प्रवेश देण्यात आले असल्याचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांनी आज जाहीर केले. वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धेत विशेष प्रवेश देण्यात आलेला 24वर्षीय अर्जुन कढे हा तिसरा खेळाडू असून याआधी प्रजनेश गुन्नेश्वरण, रामकुमार रामनाथन यांना टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या या मौसमासाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे.

एक महिन्यापूर्वी झालेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अर्जुन कढेचा सामना रामकुमार रामनाथन झाला होता. या सामन्यात अर्जुनने मानांकित खेळाडू रामकुमारवर सनसनाटी विजय मिळवला होता.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, अर्जुनने अनेक आव्हाने धैर्याने पूर्ण केली आहेत. तसेच, पुण्यात घरच्या मैदानावर स्पर्धा होत असल्यामुळे त्याच्यासाठी हि एक जमेची बाजू ठरणार आहे. वाईल्ड कार्ड प्रवेश करणाऱ्या सर्व आमच्या खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत गतविजेता व विश्व क्रमवारीत 30व्या क्रमांकाचा फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेच, जागतिक क्र.6खेळाडू केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र.25खेळाडू हुयोन चूँग आणि जागतिक क्र. 45खेळाडू मालेक झाजेरी(ट्युनेशिया) हे दिग्गज खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर

कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स

शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले