अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत शाहबाझ खान, आकांक्षा नित्तूरेचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे । पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या शाहबाझ खान, मध्यप्रदेशच्या यश यादव, राजस्थानच्या अर्पित शर्मा, महिला गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तूरे, साई अवंतिका रेवनूर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पुना क्लब टेनिस कोर्ट, लेडीज क्लब टेनिस कोर्ट व आरसीबीसी क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत शाहबाझ खानने सातव्या मानांकित आपला राज्य सहकारी अरमान भाटियाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. मध्यप्रदेशच्या यश यादव याने पश्चिम बंगालच्या सहाव्या मानांकित इशक इकबालचा 3-6, 6-3, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.

राजस्थानच्या अर्पित शर्मा याने आठव्या मानांकित फैजल कुमारचा 6-3, 2-6, 6-4असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. चौथ्या मानांकित दिल्लीच्या जतिन दहियाने आसामच्या परिक्षित सोमानीचा टायब्रेकमध्ये 6-4, (5)6-7, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. अन्वित बेंद्रे याने गुंजन जाधवचा 6-2, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

महिला गटात दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तूरेने तिसऱ्या मानांकित मध्यप्रदेशच्या सारा यादवचा 1-6, 6-2, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साई अवंतिका रेवनूर हिने सातव्या मानांकित तेलंगणाच्या निधी चिलूमुल्लाचे आव्हान 6-3, 6-2 असे संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: पुरुष गट:
सुरज प्रबोध(1)वि.वि.कुणाल वझिरानी(महाराष्ट्र)6-2, 7-6(4);
तरुण चिलकापुडी(तेलंगणा)वि.वि.केएस धीरज(तामिळनाडू)3-6, 6-4, 6-3;
यश यादव(मध्यप्रदेश)वि.वि.इशक इकबाल(पश्चिम बंगाल)(6)3-6, 6-3, 6-0;
जतिन दहिया(दिल्ली)(4)वि.वि.परिक्षित सोमानी(आसाम) 6-4, (5)6-7, 7-5;
अन्वित बेंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.गुंजन जाधव(महाराष्ट्र)6-2, 6-4;
शाहबाझ खान(महाराष्ट्र)वि.वि.अरमान भाटिया(महाराष्ट्र)(7)6-3, 6-2;
अनुराग नेनवानी(दिल्ली)(5)वि.वि.रोहन भाटिया(महाराष्ट्र) (3)6-7, 6-4, 6-1;
अथर्व शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.डेनिम यादव (5)6-7, 6-4, 7-6(2);
ध्रुव सुनीश(महाराष्ट्र)(3)वि.वि.ऋषी रेड्डी(कर्नाटक)6-3, 6-4;
अर्पित शर्मा(राजस्थान)वि.वि.फैजल कुमार(राजस्थान)(8)6-3, 2-6, 6-4;
साहिल गवारे(महाराष्ट्र)वि.वि.ओमिंदर बैसोया(हरियाणा)7-6(3), 6-1;

महिला गट: दुसरी फेरी:
वैदेही चौधरी(गुजरात)(1)वि.वि.अविका सागवाल(दिल्ली)6-2, 6-1;
श्राव्या शिवानी चिलकालापुडी(तेलंगणा)वि.वि.श्रेया तातावर्ती(आंध्रप्रदेश)3-6, 6-1, 6-3;
आकांक्षा नित्तूरे(महाराष्ट्र)वि.वि.सारा यादव(मध्यप्रदेश)1-6, 6-2, 6-2;
साई अवंतिका रेवनूर वि.वि.निधी चिलूमुल्ला(तेलंगणा)(7)6-3, 6-2;
तेजस्वी काटे(महाराष्ट्र)वि.वि.आरती मुनियन(तामिळनाडू)4-6, 6-3, 7-5;
सोहा सादिक वि.वि.आलीया इब्राहिम 6-2, 6-0.