भारताचा सार्वकालीन महान कर्णधार होण्यासाठी अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे – विराट कोहली

बेंगलोर । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्याला सार्वकालीन महान कर्णधार बनण्यासाठी अजून बरेच टप्पे पार करायचे आहेत असे म्हटले आहे. कोहलीची ही प्रतिक्रिया तेव्हा आली जेव्हा महान माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कोहलीचा भारताचा महान कर्णधार म्हणून गौरव केला.

” सुनील गावसकरांकडून अशी प्रतिक्रिया मिळणे हा मी गौरव समजतो. ही एक चांगली प्रतिक्रिया आहे. परंतु अजून बराच मोठा टप्पा पार करायचा आहे. ” , कोहली म्हणतो

सुनील गावसकर यांनी विराटचा गौरव केला होता. तेव्हा ते विराटला भारताच्या दिग्गज कर्णधारांपैकी एक असे म्हटले होते. तसेच या २८ वर्षीय खेळाडूबद्दल मोठे गौरवोद्गार काढले होते.