पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात रोहित करणार द्विशतक?

भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध द्विशतक करेल असा विश्वास व्यक्त केला आहे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल. काल भारताच्या विजयांनंतर गोयल यांनी रोहितच्या शतकी खेळीचं कौतुक करताना हा विश्वास व्यक्त केला.

काल रोहित शर्माने बांग्लादेश विरुद्ध खेळताना १२९ चेंडूत १२३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे रोहितवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा पाऊस पडला. त्यात केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयलही पाठीमागे नव्हते.

रोहित शर्माबरोबरचा अर्जुन पुरस्कार देतानाचा फोटो क्रीडामंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात गोयल म्हणतात, ” रोहितच्या जबदस्त खेळीमुळे भारताला जबदस्त विजय मिळविला. मी अंतिम सामन्यात त्याच्याकडून तिसऱ्या द्विशतकी खेळीची अपेक्षा बाळगून आहे. ”

भारताने विक्रमी चौथ्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर पाकिस्तानची ही पहिलीच चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरीत आहे.