फलंदाजीपेक्षा संजय मांजरेकर घंटा चांगली वाजवतात

लंडन। इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे.

ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशासक किंवा खेळ क्षेत्रात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

सध्या भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी घंटा वाजवण्याचा मान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना देण्यात आला होता.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होण्यापूर्वी संजय मांजरेकरांच्या हस्ते लॉर्ड्स मैदानावरील घंटा वाजवण्यात आली होती.

त्यानंतर लॉर्ड्स मैदानाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन संजय मांजरेकरांचे घंटा वाजवण्याचे कौशल्य कसे आहे? असा गमतीशीर प्रश्न लॉर्ड्स मैदानाच्या प्रशासनाने क्रिकेट चाहत्यांना विचारला आहे.

त्यावर अनेक क्रिकेट चाहत्यांनी गमतीदार उत्तरे देत संजय मांजरेकरांकडे फलंदाजीपेक्षा घंटा वाजवण्याचे चांगले कौशल्य असल्याचे उत्तर दिले. तर काही जनांनी विरारले की मांजरेकर लॉर्ड्सवरील घंटा वाजवण्या इतके महान आहेत का?

यापूर्वी या सामन्याच्या पहिल्या दिवशी ही घंटा वाजवण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देण्यात आला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होवू शकला नव्हता. त्यामुळे सचिनची लॉर्ड्स मैदानावरील घंटा वाजवण्याची संधी हुकली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

किरॉन पोलार्डच्या बाबतीत झाला आहे हा खास योगायोग

-एकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक; कर्णधार आंद्रे रसलचा धमाका