आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनची त्याच्या बायको बरोबर त्याची पहिली ओळख कशी झाली असेल याचा खुलासा त्याने ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात केला आहे. भारताच्या या रांगड्या खेळाडूची बायकोशी ओळख ही फेसबुकच्या माध्यमातून झाल्याचा खुलासा त्याने विक्रम साठ्येच्या ‘व्हॉट द डक’  या कार्यक्रमात केला आहे.

बंगाली सुंदरी असणाऱ्या आयेशा मुखर्जीला शिखर प्रथम फेसबुक या सोशल मेडिया वेबसाईटवर भेटला होता. भारताचा  फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याला हे नाव सुचवल्याचं शिखर म्हणतो. जेव्हा तिला पहिल्यांदा फेसबुकवर पाहिलं तेव्हाच ती शिखरला आवडल्याचं तो सांगतो.

त्यानंतर त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही काळाने तिने ती स्वीकारली आणि या सुंदर जोडप्यात फेसबुकच्या माध्यमातून संवाद सुरु झाला.

आयेशाचे वडील हे भारतीय तर आई इंग्लिश होती. तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी लगेच तिच कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालं. तिने नंतर किकबॉक्सिंगच प्रशिक्षण घेतलं. ती चांगलं बंगाली आणि इंग्लिश बोलते. तीच शिखर आधी एका ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी लग्न झालं होत परंतु काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला.

तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली असून एकिच नाव रेहा  तर दुसरीच आलियाह आहे.

हा विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.