प्रीमियर लीग: मॅंचेस्टर युनायटेडचा सलग दुसरा पराभव

प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला टोटेनहॅम हॉटस्परकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला. युनायटेडची ही या लीगमधील सलग दुसरी हार आहे.

1992-93 नंतर पहिल्यांदाच युनायटेड पहिल्या तीनमधील दोन सामन्यात सलग पराभूत झाले आहे. पण त्यावेळी सर अॅलेक्स फर्गुसनने ती लीग जिंकली होती. मग आताही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

तसेच टोटेनहॅम तीनही सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर लीव्हरपूल पहिल्या स्थानावर आहे.

टोटेनहॅमचे मॅनेजर मौरेसियो पोचेटिनो यांनी 3-3-3-1 या नव्या फॉर्मेशनने खेळला. पहिल्या सत्रात याचा काही फायदा झाला नाही मात्र दुसऱ्या सत्रात हॅरी केन आणि लुकास मौरा यांनी केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय झाला.

युनायटेडच्या या पराभवाचे खापर मॅनेजर जोसे मौरिन्हो यांच्या डोक्यावर फोडले जात आहे. युनायटेड 19 ऑगस्टला ब्रायटनकडून देखील 3-2 असे पराभूत झाले होते.

मौरिन्हो ज्या क्लबचे मॅनेजर राहिले आहे त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांनी एकही सामना हरला नाही. तसेच त्यांनी आतापर्यंत प्रीमियर लीगची तीन विजेतेपद मिळवले आहे.

टोटेनहॅम याआधी ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या चार सामन्यात गोल करू शकला नव्हता. या सामन्यात दोन गोल केलेल्या ब्राझिलियन लुकास मौरा या फुटबॉलपटूला टोटेनहॅमने जानेवारीतच करारबध्द केले आहे.

ब्रायटनकडून पराभूत झालेल्या सामन्यात जे फुटबॉलपटू होते त्यातील काही टोटेनहॅम विरुद्धच्या सामन्यात बाकावर बसले होते. याचाच फायदा हॉटस्परला झाला.

पॉल पोग्बा आणि फ्रेड यांनी त्यांच्या जागेनुसार चांगला खेळ केला पण त्यांना हवी तेवढी साथ मिळाली नाही. तर हॉटस्परमध्ये लुकास, क्रिस्टन एरिकसन, डेले अली यांनी केनला योग्य साथ दिली.

केनने केलेल्या गोलनंतर लगेचच दोन मिनिटांनी लुकासने गोल केल्याने हॉटस्पर 2-0 अशी आघाडीवर होती. युनायटेडने आक्रमक सामना केला पण लुकासने 84व्या मिनिटाला केलेल्या गोलवर टोटेनहॅमचा विजय पक्का झाला होता.

2 सप्टेंबरला युनायटेडचा पुढील सामना बर्नले तर टोटेनहॅमचा वॅटफोर्ड विरुद्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष- लसिथा मलिंगाबद्दल माहित नसलेल्या ५ खास गोष्टी

एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक

एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान